logo

आडगाव तांडा येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी.

न्यूज रिपोर्टर विलास चव्हाण: आडगाव तांडा येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आडगाव तांडा येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस प्रल्हाद दाभाडे (चेअरमन) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विधिवत अभिवादन करण्यात आले. व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.जयंतीनिमित्त भजन, कीर्तन तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रम पार पडले. संत सेवालाल महाराज यांनी दिलेला सत्य, अहिंसा, परिश्रम व सामाजिक ऐक्याचा संदेश आजही समाजाला प्रेरणादायी ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमात युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय व शांततामय वातावरणात पार पडला. संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा अंगीकार करून समाज एकजुटीने पुढे जावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जयंती निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर चे उपसभापती सुंदरनाईक चव्हाण, प्रल्हाद दाभाडे, मिलिंद ठोके, किशोर ठोके, झबुसिंगनाईक चव्हाण, पुरभाजी चव्हाण, गोपीचंद चव्हाण, देवीदास राठोड, पांडुरंग राठोड, विजय चव्हाण, जगन पवार, व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

4
719 views