
दौंडला टर्मिनसचा दर्जा का नाही?
दौंड : दौंड हे उत्तर-दक्षिण भारताला जोडणारे मध्यवर्ती जंक्शन असून, ब्रिटीशकालापासून येथे रेल्वेची मोठी जमीन व सुविधा उपलब्ध आहेत. तरीही येथे टर्मिनस विकसित करण्यात आले नाही, याबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत.दरम्यान, हडपसर आणि उरूळी, खडकी आदी ठिकाणी टर्मिनस उभारण्याचे प्रयत्न झाले. यामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले गेले. मात्र, दौंडकडे दुर्लक्ष झाल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. दौंड-पुणे मार्गाचे विद्युतीकरण अनेक वर्षांपूर्वी पूर्ण
झाले असले, तरी या मार्गावर विद्युत लोकलसेवा सुरू करण्यात आलेली नाही. लांब पल्ल्याच्या गाड्यांना इलेक्ट्रिक इंजिन लावण्यात आले. परंतु, प्रवाशांच्या दैनंदिन सोयीसाठी लोकलसेवा सुरू झालेली नाही, अशी तक्रार आहे.
निवडणुका संपल्यानंतर आता तरी खासदार सुप्रिया सुळे व आमदार राहुल कुल यांनी रेल्वे प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
प्रवाशांच्या प्रलंबित मागण्या…
1.दौंडला टर्मिनसचा दर्जा द्यावा.
2.दौंड-पुणे विद्युत लोकलसेवा
सुरू करावी.
3.कॉर्ड लाइन स्थानकासाठी
वाहतूक व सुरक्षा व्यवस्था.
4.विकासकामांची पारदर्शक चौकशी
5.स्थानिक लोकप्रतिनिधींनी सक्रिय भूमिका घ्यावी.
अन्यथा वाढता असंतोष उद्रेकाला कारणीभूत ठरू शकतो, अशी भावना व्यक्त होत आहे.