logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण

 नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या परिसरात देशातील सर्वात उंच हनुमान मूर्तीची निर्मिती केली जात आहे. 158 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे जवळपास 60% काम पूर्ण झाले असून लवकरच संपूर्ण काम पूर्ण करून देशाचे गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah) यांच्या उपस्थितीत या सर्वात उंच मूर्तीचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.

कशी असेल देशातील सर्वात उंच हनुमान मूर्ती? (Tallest 158 foot Hanuman Statue in the Country)

- मूर्तीची एकूण उंची 158 फूट असेल. खालच्या चौथर्याची उंची सोडून मूर्तीची एकूण उंची 158 फूट इतकी असेल.

- आतापर्यंत देशातील सर्वात उंच हनुमान मूर्ती हिमाचल प्रदेशातील सोलन येथे असून ती 157 फुटाची आहे.

- नागपुरात निर्माण केली जात असलेली हनुमान मूर्ती प्रबलित सिमेंट काँक्रीट म्हणजेच RCC ची असेल.

- त्यामध्ये काही ठिकाणी फायबर प्रबलित प्लास्टिक म्हणजेच FRP वापरले जाईल.

- मूर्तीला भेगा प्रतिरोधक बनवण्यासाठी झिंक मेटलायझिंग केलं जाईल...

- तर मूर्तीच्या पृष्ठभागावर ऍक्रेलिक रंग केला जाईल.

- 158 फुटांची मूर्ती निर्माण करण्यासाठी तब्बल 1, 178 घनमीटर काँक्रीट तर 140 टन लोखंड वापरला जाईल...

- चौवथऱ्यापासून मुकुटापर्यंत मूर्तीचा एकूण वजन 2,981 टन एवढा राहील.

- मे 2026 पर्यंत मूर्तीचे निर्माण कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

- ही उंच मूर्ती पाण्याच्या तळ्यात उभी राहणार असून अवतीभवती बोटिंग ची सोय केली जाणार आहे.

- परिसरात बटरफ्लाय गार्डन ही उभारले जाईल.

नागपूर शहरापासून दक्षिणेस अवघ्या 20 किमी अंतरावर असलेले कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे तमाम भाविकांचे शक्तीपीठ आहे. इतर दिवसांच्या तुलनेत दरवर्षी आश्विन महिन्यातील नवरात्री आणि शारदीय नवरात्रोत्सवात कोराडी मंदिरात मोठी गर्दी होते. या दिवसात येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. महालक्ष्मी जगदंबा देवी भक्तांना दररोज तीन रुपात दर्शन देते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यात सकाळी देवी कुमारिका रूपात असते, दुपारी देवी सुहासिनी रुपात असते तर संध्याकाळी देवी प्रौढ स्त्रीच्या रुपात दर्शन देते अशी आख्यायिका आहे. अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेला या महालक्ष्मी जगदंबा मंदिराचे नुकतेच नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.  त्यात आता देशासह जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती निर्माण केली जाणार आहे.
www.merabharatsamachar.com

7
296 views

Comment