logo

मनरेगा मजुरांचे वेतन निधीअभावी रखडले — तीन महिन्यांपासून मजुरांवर उपासमारीची वेळ...

महाराष्ट्रातील मनरेगा मजुरांचे तीन महिन्यांपासून वेतन थकीत — प्रशासनाच्या आश्वासनानंतरही पैसे नाहीत
महाराष्ट्र — राज्यातील महत्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन प्रलंबित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. काम पूर्ण करूनही मजुरांच्या बँक खात्यात मजुरी जमा झाली नसल्याने ग्रामीण भागात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मनरेगा विभाग, महाराष्ट्र (नागपूर) कार्यालयाकडून दिनांक 26जानेवारी 2026 रोजी दिलेल्या पत्रात मजुरी निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर वितरण प्रक्रिया करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मजुरी PFMS प्रणालीद्वारे मजुरांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तीन महिने उलटूनही मजुरांना पैसे मिळाले नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मनरेगा कायद्यानुसार काम पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत मजुरी देणे बंधनकारक आहे. विलंब झाल्यास मजुरांना व्याजासह मजुरी देण्याची तरतूद आहे. त्यामुळे संबंधित मजुरांनी थकीत वेतन तात्काळ जमा करून विलंबाबद्दल व्याज देण्याची मागणी केली आहे.

6
584 views