नाशिक मध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्सवाला साजरी
*नाशिक मध्ये महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी*
नाशिक मध्ये आज महाशिवरात्रीचा मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळाला.
नासिक मधील प्रत्येक महादेवाच्या मंदिरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या उत्साहाने भाविक आपापल्या पद्धतीने शिव आराधना व पूजा करत होते. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे त्यामुळे या उत्सवाला इथे मोठ्या प्रमाणात मान दिला जातो. त्यामध्ये काही ठिकाणी या उत्सवानिमित्त यात्रेचे सुद्धा आयोजन केले जाते. बाल गोपाळ आणि वरिष्ठ नागरिक भक्तगणांकडून भगवान शंकर महादेवांना आराधना केली जाते. या उत्सवाच्या वेळी महाप्रसादासाठी केळी, खिचडी अशा अनेक प्रकारच्या उपवासाच्या पदार्थांचे आयोजन करण्यात आले होते. हर हर महादेव, जय भोलेनाथ अशा गजरांनी नाशिक दुमदुमून निघाले होते.