संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त डोणगाव येथे उत्साहपूर्ण कार्यक्रम
डोणगाव प्रतिनिधी सालार
डोणगाव : बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतीवीर संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती १५ फेब्रुवारी रोजी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोणगावचे सरपंच चरण पाटील आखाडे होते. त्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच श्याम इंगळे, माजी सरपंच जुबेर खान, सद्दाम शहा, राजेश जाधव, तसेच डोणगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे, हमीद भाई मुल्लाजी, सुरेश भाऊ फिसके, अबरार खान मिल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोणगाव येथील अनिल राठोड व सतीश राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी गावातील नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.