पॉवर लिप्टींग स्पर्धेत संतोष बंधाटे यांना गोल्ड
तिरोडा : महाराष्ट्र राज्य पॉवर लिप्टींग स्पर्धा व सिंगल ईवेंट ब्रेच प्रेस व डेडलिप्ट स्पर्धा २०२५ २१ते२३ ऑगस्ट दरम्यान आयोजीत करण्यात आली. स्पर्धेत १०० ते १०५ किलो वजन गटामध्ये तुमसर येथील सेंटर पॉईन्ट हेल्थ क्लबचे खेळाडु संतोष ब्रम्हानंद बंधाटे यांनी प्रथम स्थान पटकाविले. त्यांनी सदर श्रेणीमध्ये Squat 140 Kg. बेंच प्रेस मध्ये १२० किलो व डेडलिष्ट स्पेर्धे मध्ये १७० किलो वजन उचलुन प्रथम स्थान पटकाविले. त्यांनी एकुण पुर्ण स्पर्धेमध्ये एकुण ४३० किलो वजन उचलले. आहे. संतोष बंधाटे हे अदानी पॉवर, तिरोडा येथे एसटीएफ या पदावर कार्य करतात.