logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

MKD English Medium School व MKD Vidyalaya, Nandurbar यांचे जिल्हास्तरीय जम्परोप स्पर्धेत घवघवीत यश*

*MKD English Medium School व MKD Vidyalaya, Nandurbar यांचे जिल्हास्तरीय जम्परोप स्पर्धेत घवघवीत यश*

महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली व नंदुरबार जिल्हा जम्परोप असोसिएशन यांच्या वतीने आयोजित छत्रपती चषक १२ वी जिल्हास्तरीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धा २०२६ दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत MKD English Medium School, Nandurbar व MKD Vidyalaya, Nandurbar येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण व रौप्य पदके पटकावून शाळेचा गौरव वाढविला.
*30-Second Double Under* या प्रकारात सुहास रोमन्या वसावे, पुष्कर सूर्यवंशी, निखिल नोविद वसावे व मनप्रीत सैदाणे यांनी सुवर्णपदक मिळविले. तसेच *3-Minute Endurance*
या प्रकारात आयुष किसन वसावे, यश प्रशांत चौधरी,
रोहन पृथ्वीराज वळवी व स्वप्निल बारक्या पाडवी यांनी रौप्यपदक पटकावले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक मा. शुभम किशोर दराडे, प्रशासकीय अधिकारी सचिन भोंगळे तसेच शाळेचे प्राचार्य जिनेश के. यू. यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. प्रशांत शिंदे, योगेश मोरे, चंद्रकांत बारस्कर, जगदीश जाधव व संदीप माळी यांचे मार्गदर्शन लाभले

22
81 views

Comment