logo

Aima midiya jan jan ki avaj दिनांक 14.02.2026 am1:53 Pune Metro: खुशखबर..! आजपासून स्वारगेट, शिवाजीनगर, पीसीएमसी मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त सुविधा म

Aima midiya jan jan ki avaj
दिनांक 14.02.2026 am1:53
Pune Metro: खुशखबर..! आजपासून स्वारगेट, शिवाजीनगर, पीसीएमसी मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त सुविधा
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड मनपा स्थानकांवरील अतिरिक्त प्रवेशद्वार मेट्रो प्रवाशांसाठी आजपासून (१४ फेब्रुवारी) खुले करण्यात येणार आहे.पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड मनपा स्थानकांवरील अतिरिक्त प्रवेशद्वार मेट्रो प्रवाशांसाठी आजपासून (१४ फेब्रुवारी) खुले करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही स्थानके वापरात आणण्यासाठी निर्णय घेण्यात आला असून, प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा होणार आहे, असे ‘महामेट्रो’कडून करण्यात आले.तिन्ही प्रवेशद्वारे प्रवाशांच्या सेवेत आणल्यामुळे प्रवाशांना रस्ते ओलांडून स्थानकात प्रवेश करण्याची गरज भासणार नसून, थेट स्थानकात ये-जा करता येणार आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही टळणार असल्याचे ‘महामेट्रो’ने पत्रकात नमूद केले आहे.

मेट्रोची प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरक्षित आणि सुलभ प्रवास करण्यासाठी मेट्रो प्रवास निवडला जात आहे. भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ‘महामेट्रो’ने दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्थानकांवर अतिरिक्त प्रवेशद्वाराची सुविधा तयार करण्याचे धोरण आखले होते. बसस्थानक किंवा इतर ठिकाणावरून थेट मेट्रो स्थानकात सुलभ प्रवास करता यावा, यासाठी अतिरिक्त स्थानकांचे काम सुरू होते. या स्थानकांची कामे पूर्ण झाल्याने प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
प्रामुख्याने पिंपरी चिंचवड मनपा मेट्रो स्थानकावरील तिसऱ्या क्रमांकाचे प्रवेशद्वार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दिशेने आहे. पिंपरी शहरातील प्रवाशांना शहरातील प्रवाशांना रस्ता ओलांडण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर स्वारगेट मेट्रो स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शहराचे हे मध्यवर्ती ठिकाण असून, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) मुख्य बस स्थानक आहे. चारही दिशांनी या ठिकाणी वाहनांची वाहतूक मोठी असल्याने एसटी स्थानकातून किंवा रिक्षा स्थानकावरून मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. ‘महामेट्रो’ने भुयारी मार्गाद्वारे प्रवेशद्वार थेट एसटी स्थानकाला जोडले आहे. त्यामुळे बस स्थानकातून थेट मेट्रो स्थानकात प्रवेश करता येणार असून स्वारगेट, जेथे चौक ओलांडण्याची आवश्यकता भासणार नाही.

तसेच, मध्यवर्ती स्थानकापैकी शिवाजीनगर बस स्थानकही तितकेच महत्त्वाचे असून, या ठिकाणी वाहतूककोंडीचा पादचाऱ्यांना सामना करावा लोगतो. त्यामुळे ‘महामेट्रो’ने आकाशवाणी केंद्राजवळ (शिमला चौक) ते गणेशखिंड रस्ता, कृषी महाविद्यालयाच्या बाजुने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना भुयारी मार्गाद्वारे मेट्रो स्थानकात प्रवेश करता येणार आहे. थेट मुख्य रस्त्याशी जोडणी मिळाल्याने मेट्रो प्रवास आणखी सुलभ होणार असल्याचे ‘महामेट्रो’कडून सुलभ प्रवास करता येणार आहे, असे ‘मेट्रो’कडून स्पष्ट करण्यात आले.

मेट्रो प्रवाशांची वाढती संख्या पाहता त्यांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास आणि वेळेची बचत करणारा प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्थानकांची आणि मार्गांची जोडणी करण्यात आली आहे. – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो,

6
257 views