logo

Aima midiya jan jan ki दिनांक 14.02.2026 am 13:49 धक्कादायक! भीषण आगीत बस जळून खाक…मोठी दुर्घटना टळली… गाडीमध्ये ५० प्रवासी असून, चालकाच्या प्रसंगाव

Aima midiya jan jan ki
दिनांक 14.02.2026 am 13:49

धक्कादायक! भीषण आगीत बस जळून खाक…मोठी दुर्घटना टळली…
गाडीमध्ये ५० प्रवासी असून, चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणालाही इजा झाला नाही.पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) चाकण औद्योगिक वसाहतीतीतल तळवडे मार्गावर धावणाऱ्या ठेकेदाराच्या खासगी कंपनीच्या बसला अचानक भीषण आगल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. गाडीमध्ये ५० प्रवासी असून, चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणालाही इजा झाला नाही.दरम्यान, चौकशीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेकडे (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट – सीआयआरटी) संबंधित बस तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

पीएमपीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चाकण औद्योगिक वसाहतीतील स्थानिक आणि कामगारांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या पीएमपी सेवेत ठेकेदारांच्या सेवेतील इलेक्ट्रिक बसचे संचालन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी तळवडे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीजवळ ५० प्रवासी घेऊन जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसच्या पाठीमागील बाजूने धूर निघण्यास सुरुवात झाली. चालकाला ही बाब निदर्शनास येताच चालकाने बस रस्त्याच्या डाव्या बाजूला उभी करून तातडीने प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. काही क्षणात आगीने ज्वाळा पसरून बसने पेट घेतला. प्रथमदर्शनी इलेक्ट्रिक बसमध्ये शाॅर्ट सर्किट झाली असल्याची शक्यता समोर येत आहे.’उन्हाळा सुरू झाला असून, भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून संबंधित ठेकेदारांच्या बस तातडीने ‘सीआयआरटी’ या संंस्थेत पाठवून तपासणी करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पीएमपीच्या बसला आग लागण्याच्या किमान १० ते १२ घटना समोर आल्या आहेत. यामध्ये तांत्रिक बिघडाचे करणे दिली जात आहेत. पण या तांत्रिक चुकांची जबाबदारी प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. प्रत्येक फेरीनंतर बसच्या इलेक्ट्रिकल वायरिंगची तपासणी होणे गरजेचे असते, बसमध्ये अग्निशमन उपकरणे सुस्थितीत असावीत आणि चालकांना त्याच्या वापराचे प्रशिक्षणही देणे बंधनकारक आहे. वाहनात बिघाड किंवा धूर निघताच अलार्म वाजणारी यंत्रणा बसमध्ये असणे अनिवार्य आहे, असं संबंधित घटना टाळण्यासाठी गरजेचं असल्याचे मत आयडितीआरच्या तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, प्रशासनाने या घटनांची केवळ कागदोपत्री चौकशी न करता दोषींवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे, अन्यथा प्रवाशांचा प्रवास हा कधीही अंतिम प्रवास ठरु शकतो, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

1
0 views