logo

Aima midiya jan jan ki avaj दिनांक 14.2.2026 Sanjay Raut : राज्यसभेवर जाण्याबाबत शरद पवारांनी मांडली ‘ही’ भूमिका; संजय राऊतांचा मोठा खुलासा; म्हणाले,

Aima midiya jan jan ki avaj
दिनांक 14.2.2026 Sanjay Raut : राज्यसभेवर जाण्याबाबत शरद पवारांनी मांडली ‘ही’ भूमिका; संजय राऊतांचा मोठा खुलासा; म्हणाले, “त्यांनी मला…”
खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच राज्यसभेवर जाण्याबाबत शरद पवारांची नेमकी भूमिका काय? याचाही खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.Sanjay Raut On Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. यातच सात राज्यसभा सदस्यांची मुदत एप्रिलमध्ये संपत आहेत, यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेत जावं अशी मागणी करण्यात येत आहे.
या घडामोडींवर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच राज्यसभेवर जाण्याबाबत शरद पवारांची नेमकी भूमिका काय? याचाही खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. ‘त्यांनी (शरद पवार) मला सांगितलं की राज्यसभेची ही निवडणूक ते पुन्हा लढवणार आहेत’, असं संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?
एप्रिलमध्ये राज्यसभेच्या काही जागा रिक्त होत आहेत आणि जर महाविकास आघाडीतील गणित आपण पाहिलं तर तिन्ही पक्षाचा एखादाच उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतो. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसचं याबाबत काय मत आहे? शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जावेत का? असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला.

1
24 views