
शेवगाव तालुक्यात घुमणार शिवसेनेचा डरकाळी; एकाच वेळी ५४ शाखांचे होणार उद्घाटन!
शेवगाव (प्रतिनिधी): शेवगाव तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ॲड. शिवाजी काकडे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. तालुक्यातील तब्बल ५४ गावांमध्ये एकाच वेळी शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या उपक्रमामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते बाबूशेट टायरवाले आणि संजय भोर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्याच हस्ते सर्व शाखांचे रितसर उद्घाटन करण्यात येणार असून, याच वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा 'पदभार सोहळा' देखील पार पडणार आहे.
भगवे वादळ तालुक्यातील ५४ गावांमध्ये शिवसेनेचा झेंडा अधिकृतपणे फडकणार आहे.शिवाजी काकडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे मोठे संघटन या माध्यमातून दिसून येणार आहे. तळागाळातील शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी आणि गावपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी या शाखांचे जाळे निर्माण केले जात आहे.
"प्रत्येक गावात शिवसेनेचा विचार पोहोचवणे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. ५४ शाखांच्या माध्यमातून आम्ही तालुक्यात नवीन पर्व सुरू करत आहोत."
— ॲड. शिवाजी काकडे
या भव्य विस्तारामुळे आगामी काळात शेवगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या सर्वत्र या 'शाखा उद्घाटन' मोहिमेचीच चर्चा सुरू आहे.