logo

शेवगावचे दोन चिमुकले क्रिकेटपटू गोवा कॅम्प टी ट्वेंटीसाठी निवडले.

शेवगाव तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब असून निर्मल ब्राईट फ्युचर स्कुल शेवगाव येथील दोन विद्यार्थी क्रिकेटपटूंची गोवा येथे होणाऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट लीग कॅम्पसाठी निवड झाली आहे. आदित्य किसन बैरागी (वय ९ वर्षे) आणि विवेक कुमार रणमले (वय १० वर्षे) यांनी गेल्या आठवड्यात पुणे येथे पार पडलेल्या ट्रायल मॅचमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या दमदार परफॉर्मन्सच्या जोरावर लहान गटातील टी ट्वेंटी NPL क्रिकेट लीग अंतर्गत गोवा कॅम्पमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांसाठी या दोन्ही खेळाडूंची शेवगाव तालुक्यातून निवड झाली आहे. या यशा मुळे शेवगाव तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करनार आहे. भविष्यात हे दोन्ही खेळाडू शेवगाव तालुक्याचे नाव देशपातळीवर नावलौकिक करतील, असा विश्वास निर्मल ब्राईट फ्युचर अकॅडमीचे प्रशिक्षक, स्टाफ तसेच मार्गदर्शक शिक्षकांनी व्यक्त केला आहे. या दोन चिमुकल्या खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तालुका भरातून त्यांच्यावर अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

30
1510 views