छेडछाड करणाऱ्या युवकाला धुतले
जळगावः शहरातील आर. आर. विद्यालय परिसरातील एका मेडिकल स्टोअरमध्ये गुरुवारी सायंकाळी ७वाजता औषधे घेण्यासाठी आलेल्या एका युवतीची छेड काढणाऱ्या युवकाला युवतीच्या नातेवाइकांनी मेडिकलमध्येच बेदम चोप दिला. गुरुवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी एका मेडीकलमध्ये एक युवती औषधे घेण्यासाठी आली होती. यावेळी तिथे उपस्थित एका युवकाने तिची छेड काढली. या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने तातडीने आपल्या नातेवाईकांना फोनवरून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून युवतीचे नातेवाईक अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळावर झाले. दाखल संतापलेल्या नातेवाईकांनी त्या मेडीकलमध्ये घुसून संबंधित टवाळखोर युवकाला जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. भररस्त्यात युवकाला चोप मिळत असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.