logo

ग्रामसभा न घेणे भोवले, कासारेच्या सरपंच अपात्र



धुळे : नियमानुसार वर्षातून किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना, त्या न घेतल्याप्रकरणी साक्री तालुक्यातील कासारे गावच्या सरपंच सुवर्णा देसले यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गावातील उपसरपंच माधुरी खैरनार आणि काही सदस्यांनी सरपंच देसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. निर्धारित कालावधीत ग्रामसभा न बोलावून सरपंचांनी आपल्या कामात कसूर केला आहे, असा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला होता.

या तक्रारीची दखल घेत सुवर्णा पवार, सुवर्णा जाधव, माधुरी खैरनार, लीना भावसार, अल्का गवळे, लता जगताप, राहुल देसले, उल्केश देसले,

देवीदास देसले, नफिस शहा आणि आबा अहिरे आदींनी अॅड. नितीन रायते यांच्यामार्फत ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सरपंच अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार केली होती.

या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सादर करण्यात आलेले पुरावे आणि कागदपत्रे तपासल्यानंतर, सरपंच सुवर्णा देसले यांनी निश्चित काळात ग्रामसभा न बोलावून कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे, तक्रारदारांचा अर्ज मंजूर करत जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच सुवर्णा देसले यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला आहे.

तसेच, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश साक्री तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

0
179 views