logo

*परळी शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करा; पी वन पी टू प्रणाली कार्यान्वित करा*

*परळी शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करा; पी वन पी टू प्रणाली कार्यान्वित करा*

*राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शहर पोलीस ठाण्याकडे ठोस मागणी*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):
परळी शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना शहरात बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशन व संभाजीनगर पोलीस स्टेशन परळी वैजनाथ येथे निवेदन देण्यात आले.
शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करावेत, वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक असलेली पी वन पी टू प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, तसेच ज्या ठिकाणी पोलीस चौक्या आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी किमान एक पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करावा, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
परळी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, मुख्य रस्ते व गर्दीच्या ठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली असून योग्य नियोजन व नियंत्रणाअभावी वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे, पी वन पी टू प्रणाली आणि पोलीस तैनाती या तिन्ही गोष्टी शहर सुरक्षेचा कणा आहेत, मात्र त्या सध्या दुर्लक्षित असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास भविष्यात मोठ्या अनुचित घटनांना आमंत्रण मिळू शकते, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित शहर अध्यक्ष जीवनराव देशमुख,उत्तमराव माने, नगरसेवक नितीन बागवाले, नगरसेवक कादर कुरेशी, महादेव गंगणे, वैजनाथ कळसकर, अमर रोडे, अरुण सपाटे, सद्दाम शेक, राजा खान आदींची उपस्थिती होती.


@@@@@@@@

शहरातील सर्व बंद सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करून शहरावर डिजिटल नजर ठेवण्यात यावी, वाहतुकीसाठी आधुनिक प्रणाली प्रभावीपणे राबवाव्यात आणि पोलीस चौक्यांवर कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केली आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्यास शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा मिळेल, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
60 views