logo

पाटलाचं घोडं


लेख

पाटलाचं घोडं
=============

60,65 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमचं गाव तालुक्याचे गाव म्हणून प्रसिद्ध, त्यावेळेला गावामध्ये एकमेव फोर व्हीलर जीप मामलेदार साहेबांची असायची, गावात पहिली ट्रक धनु वाण्याच्या दुकानापुढे उभी राहिली. ते पाहण्यासाठी गावातले लोक कितीतरी दिवस तिच्याभोवती उभे राहून गाडीची पाहणी करत होते. एवढे त्यांना गाडीचे अप्रूप वाटत होते. त्या अगोदर दोन तर्फा असलेल्या बाजारपेठेमधून पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसलेले श्रीपत पाटलाची स्वारी म्हणजे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी म्हणजे, बाहेरच्या माणसाला नवल वाटावी अशी गोष्ट होती. घोड्याच्या गळ्यातील घुंगरांचा
आवाज ऐकला म्हणजे रस्त्यावर चालणारे लोक घाई घाईने बाजूला उभे राहत आणि कौतुकाने पाटलांच्या स्वारीकडे बघत असत. प्रौढ गडी माणसं पाटलाच्या दिशेने हात जोडत असत. पाटलांचा घोडा चावडी समोर आलेला बघताच सावळा महार पुढे धावत जाऊन घोड्याचा लगाम धरी आणि रुबाबात उतरणाऱ्या पाटलांना कमरेत वाकून जोहार करीत असे. सावळा महार, पाटलाच्या घोड्याचा ओळखीचा झाला असल्यामुळे, सावळ्याने त्याच्या मानेवरून हात फिरवला म्हणजे तो पण सावळ्याच्या दिशेने मान पुढे करीत असे. आठवड्यातून ठरवलेल्या तीन दिवशी, पाटलाचा घोडा सोना याला नदीवर नेऊन, त्याला आंघोळ घालून म्हणजे स्वच्छ धुऊन आणण्याचे काम सावळाकडे होते. महारकीच्या कामाचाच तो एक भाग होता. त्यावेळेला नदीवर जाताना, सावळा सोना घोड्याला घेऊन गावा बाहेर असलेल्या महार वाड्यात आपल्या घराकडे येत असे. महार वाड्यात प्रवेश करण्यापूर्वी एका मोठ्या दगडावर उभे राहून खोगीर नसलेल्या सोना घोड्यावर तो
आरुढ होत असे. घराजवळ येताच तो आपल्या मुलाच्या नावाने पुकारा करीत असे, अरे वसंता
न्याहरीची तयारी झाली का रे बाबा, मला घाई आहे. आपल्या वडिलांचा आवाज ऐकताच, दहा-बारा वर्षाचा असलेला वसंता बाहेर येई आणि घोड्याचा लगाम हातात धरून आपल्या वयाच्याच असलेल्या त्याची मित्रमंडळी मधु, कृष्णा, रव्या या सगळ्यांना घेऊन सोना घोड्याच्या पाठीवर बसवत असे.खोगीरा शिवाय बसले की सगळी बालगोपाळ मंडळी घोड्याच्या उघड्या पाठीवर त्यांना असुरक्षित आणि गंमत सुद्धा वाटत असे. घोड्याच्या मानेच्या दिशेने एकमेकांना चिकटून, वाकून बसलेली ती मुलांची रपेट महारवाड्याच्या चारही आळीतून फिरत असे. घराच्या बाहेर पडलेला सावळा मुलांना उद्देशून पुकारा करी चला रे मुलांनो आता बास झाले. त्यावेळेला आजूबाजूच्या घरातील एक दोन बाया,एक दोन गडी पुढे होऊन सावळा कडे बघत असत आणि सावळाचा तो तोरा पाहून ते तोंडातल्या तोंडात पुटपुट असत, पाटलाच घोड आणि महाराला भूषण. हा प्रसंग मला त्यादिवशी यासाठी आठवला, सकाळची फेरी आटपून, रोजच्या प्रमाणे मी शहाळीचं पाणी पिण्यासाठी, त्या गाडीवाल्या जवळ उभा होतो. त्याच्या शेजारी उसाच्या रसाची गाडी, त्याच्यापुढे वडापाव वाल्याची गाडी अशी खाद्य विक्रेत्यांची लाईनच उभी आहे. त्या प्रत्येकाच्या बरोबर घाई गडबड करीत, एक पांढरे कपडे घातलेला तरुण पुढे मागे फिरत होता. त्याचा चेहरा माझ्याकडे झाला. त्यावेळेला मला जे दिसले.ते पाहून मी चक्राहूनच गेलो. कारण नेहमी नाक्यावर उभा असलेला तो रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मी ओळखत होतो. त्याच्या गळ्यात निळा गमच्या आणि छातीवर कमळाचा बिल्ला पाहून माझ्या लक्षात आले. महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यामुळे, तो भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गडबडीला लागला होता. तो जरासा दूर गेलेला आहे पाहून, ते विक्रेते बोलू लागले. उसाचा रसवाला सांगत होता,कार्यकर्त्यांना उसाचा रस त्या छोट्या ग्लासमध्ये देत जा. वडापाव वाल्याला सांगत होता वड्याची साईज छोटी ठेव, शहाळी वाल्याला सांगत होता मलई वाला और पानी वाला का किंमत दस दस रुपये से ज्यादा करो. त्या प्रत्येकाने झालेल्या हिशोबाचे 20/ 20 टक्के त्याला द्यायचे असा त्याचा हिशोब अगोदरच ठरविण्याचे काम चालले होते. तोपर्यंत एक एक कार्यकर्ता जमू लागला. येईल त्या कार्यकर्त्याला या वडापाव घ्या, ज्यूस घ्या असा त्याचा आग्रह चालू होता. तोच जॅकेट धारी पक्षाचा मुख्य कार्यकर्ता तिथे अवतरला, त्याला पाहून आमचा कार्यकर्ता कमरेत वाकून, त्याला जोहार टाईप मुजरा करीत होता. जसा सावळा पाटला पुढे करीत होता तसा या कार्यकर्त्याला पाहून मला ते दिवस आठवले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीव तोडून सांगत होते. महारकीच्या कामामुळे माझा माणूस स्वाभिमान शून्य झालेला आहे. म्हणून 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वाश्रमीच्या महार समाजाला बौद्ध धम्मदीक्षा दिली आणि निक्षून सांगितले तुम्ही शहराकडे चला महारकीची कामे सोडा.
माझ्या माणसाने स्वाभिमानी झाले पाहिजे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात आज 60/70 वर्षे उलटून गेली तरी पाटलाचं घोडं आणि महाराला भूषण ह्या गर्तेतून पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा बौद्ध समाज बाहेर पडला नाही. डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मोठी हार यापेक्षा काय असू शकते?
" लाचारांची फौज जमविण्यापेक्षा विचारांच वादळ उभे
करू "

भीम बाणा संघटना प्रचार आणि प्रसार लेखमाला!

अध्यक्ष:
सयाजी वाघमारे
no. 9892066967
प्रचार प्रमुख :
विलास पवार
no. 8691091972
[11/02, 8:01 am] devashishtokekar05: Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views