logo

बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात आनंद मेळावा यशस्वी

बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात आनंद मेळावा यशस्वी

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयातील शाळेतील स्काऊट व गाईडच्या वतीने आनंद मेळावा नुकताच यशस्वी करण्यात आला.
कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक दिनेश साकुरे यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जयंत प्रधान तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
इयत्ता पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला होता. खाद्यपदार्थाचे एकूण ४० स्टॉल लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अतिशय रुचकर पदार्थ शाळेत आणून विक्री केली व खऱ्या कमाईचा आनंद घेतला. शाळेतील सर्वच विद्यार्थी व शालेय कर्मचाऱ्यांनी सुद्धा वेगवेगळ्या रुचकर पदार्थांचा आस्वाद घेतला. स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांना शाळेतील क्रीडा शिक्षक प्रशांत घाटबांधे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम अतिशय उत्साह व आनंदाच्या वातावरणात पार पडला.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
67 views