logo

नूतन कन्या शाळेत माता पालक मेळाव्यांतर्गत "मुलींना समजून घेतांना"-'एक सुसंवाद' कार्यक्रम

नूतन कन्या शाळेत माता पालक मेळाव्यांतर्गत "मुलींना समजून घेतांना"-'एक सुसंवाद' कार्यक्रम

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- स्थानिक नूतन कन्या शाळेत "मुलींना समजून घेतांना "--'एक सुसंवाद 'हा कार्यक्रम माता पालक मेळाव्यांतर्गत घेण्यात आला. या मेळाव्यात माता पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापक तसेच माता-पालक संघाच्या अध्यक्ष निलु तिडके होते. याप्रसंगी माता पालक संघाच्या उपाध्यक्ष श्वेता नशिने, सहसचिव ज्योती टंडन व प्रमुख वक्ता म्हणून माता पालक अनिता भुजाडे उपस्थित होत्या. विविध विषयांवर प्रमुख वक्त्या व शिक्षिकांनी विदयार्थिनींची वर्तणुक व सवयी, बदलती जीवनशैली, त्यांचे दुष्परिणाम, विदयार्थिनींची शैक्षणिक प्रगती, वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य, परीक्षेला सामोरे जातांना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा गैरवापर या विषयांवर माता पालकांना सविस्तर माहिती देऊन समुपदेशन केले.
माता पालकांनी थेट शिक्षकांशी संवाद साधून आपल्या पाल्यांच्या समस्या अडचणी, क्षमता, योग्य, अयोग्य वर्तन यावर सुसंवाद साधला. माता पालक मेळाव्यात निलु तिडके यांनी माता ही संपूर्ण विश्वाचा केंद्रबिंदू असून अवघ्या विश्वाचे वर्तुळ तिच्यामुळे पूर्ण होते असे प्रतिपादन करून मातेच्या गर्भशाळेतच अपत्यावर संस्कार होतात त्यात वर्तमानातील संस्कारांची भर घालून ते जोपासणे व आजच्या आव्हानात्मक युगात मुलींची मैत्रीण बनून चांगले वाईट यातील फरक आयुष्याच्या या वळणावर समजावून सांगणे, तिच्या मानसिक व शैक्षणिक विकासाकरिता घरी निकोप वातावरण ठेवून तिच्या संवेदनशील मनास जपणे व तिच्या सुरक्षित भवितव्याची तरतुद करणे हे माता व शिक्षक मातांचे कर्तव्य असल्याचे सुसंवादी व सकारात्मक भूमिकेतून स्पष्ट केले. माता पालकांनी वेळोवेळी शिक्षिकांना भेटून चर्चा केल्यास मुलींच्या प्रगतीचा व वर्तणुकीची माहिती घेता येईल असे मत उपाध्यक्ष श्वेता नशिने यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्त्ता भुजाडे यांनी शाळेतील पोषक शैक्षणिक वातावरण व विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाकरिता शाळेत होणारे संस्कार यामुळे मुलींमध्ये होणारा सकारात्मक बदल याबाबत माहिती देवून मातांना आपल्या मुलींकरिता आईची भूमिका मार्गदर्शनातून सांगितली. शिक्षिका रोहिणी मोहरील यांनी लोप पावत चाललेल्या जीवनमूल्यांमुळे भरकटलेल्या पिढीकरिता मूल्यशिक्षण ही काळाची गरज असून शाळेत घेण्यात येणारे उपक्रम, शालेय शिस्त , अभ्यासक्रम व विदयार्थिनींचा सर्वार्थाने विकास साधण्याकरिता माता व शाळेत मातेची भूमिका निभावणारी शिक्षिका यांचे संबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता असल्याचे व या मेळाव्याचे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. शिक्षिका मनिषा रहांगडाले यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला जाण्यापूर्वी घ्यावयाची काळजी व परीक्षेत घ्यावयाची खबरदारी यावर मातांना उद्बोधन केले व आईने मुलीची मानसिकता ओळखून या काळात प्रेमाने वागावे असे सांगितले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका रश्मी मोहरकर यांनी वयात येतांना होणारे शारिरीक व भावनिक बदल याबाबत माहिती देवून मुलींची वैयक्तिक स्वच्छता ही केवळ सवय नसून आरोग्य, आत्मविश्वास व सुरक्षिततेचा आधार आहे असे मत व्यक्त केले.
शालेय परिसर स्वच्छतेबाबत महत्त्व पटवून देवून स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी असल्याचे विशद केले. शिक्षिका रश्मी जोशी यांनी विद्यार्थिनींचा सतत वाढत असलेला मोबाईलचा वापर, त्याचे फायदे आणि दुष्परिणाम हयावर उत्तम मार्गदर्शन केले. तसेच मोबाईलचे उपयोगी व अन्य विविध ॲप्स याविषयी माहिती देवून मोबाईलचा गैरवापर करून चुकीच्या वाटेने जाणाऱ्या या नवीन पिढीला यातून बाहेर काढणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
पर्यवेक्षक श्रद्धा रामेकर यांनी शाळेतील विदयार्थिनींची वर्तणुक, वैयक्तिक समस्या, त्यावर शाळेत विशेष समुपदेशन करुन विदयार्थिनींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात शिक्षकांचे यशस्वी प्रयत्न यावर प्रकाश टाकून 'स्त्री ही बंदिनी, हृदयी पान्हा, नयनी पाणी' या मार्मिक गीताने मातांची मने जिंकली. शालिनी घमे यांनी समाजात घडणाऱ्या विदारक घटनांची माहिती देवून आईला जागरूक राहून मुलींना जपावे असे मत व्यक्त करुन सावित्रीबाई फुले यांच्यावरील स्वरचित कविता सादर केली. किरण सुर्यवंशी यांनी आपल्या उत्तम संस्कारांवर व शाळेत घेण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या परिश्रमावर विश्वास असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. मेळाव्यास माता पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी पर्यवेक्षक श्रद्धा रामेकर व प्रिया ब्राह्मणकर उपस्थित होत्या. मुख्याध्यापक निलु तिडके यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन माता पालक समितीतील शिक्षिकांनी केले.
संस्थाध्यक्ष ॲड. एम. एल.भुरे, संस्था सचिव शेखर बोरसे, औसंस्था सदस्य रेखा पनके, प्रमोद पनके यांनी यशस्वी उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट, समुपदेशनात्मक संचालन रोहिणी मोहरील यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून केले तर आभार सुनिता तिरमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षिका स्नेहल सार्वे, कविता चरडे, ज्योती शेंडे, सुनिता तिरमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
377 views