श्रीरामपूर शहरातील "आदर्श लॉज" पोलीसांकडून सीलबंद...
श्रीरामपूर शहरातील "आदर्श लॉज" पोलीसांकडून सीलबंद...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक ०४/०९/२०२५ रोजी अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांना मिळालेल्या गोपनिय माहिती प्रमाणे श्रीरामपुर शहरात आदर्श लॉज येथील मॅनेजर धीरज हा स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता मुलींना पैशाचे अमिष देवुन देहव्यापारास प्रवृत्त करुन सदर लॉजिंगवर जागा उपलब्ध करुन त्यांचेकडुन कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवित आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर व पोलीस निरीक्षक, श्रीरामपुर शहर यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरुन पो.नि. नितीन देशमुख, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांनी पोलीस पथक तयार करुन बनावट ग्राहक तसेच दोन पंचासह सापळा / छापा कारवाई केली असता तेथे आदर्श लॉजच्या कॉऊटंरवर धीरज बिंगले, वय ३५ वर्ष, धंदा मॅनेजर आदर्श लॉज, रा. रंगोली रोड, वार्ड क्रं.०५,श्रीरामपुर हा मिळुन आला. तसेच सदर लॉज मध्ये ३ पिडीत महिला या मिळुन आल्या असुन तपासात सदर मॅनेजर व त्याचा साथीदार अहमद शेख, रा. बाबरपुरी, वार्ड नं. २, श्रीरामपुर (फरार) हे सदर महिलांकडुन वेश्या व्यवसाय करुन ग्राहकांकडुन पैसे घेऊन, वैश्या व्यवसाय करुन घेतात. यावरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक ०४/०९/२०२५ रोजी गु.र.नं. ८२३/२०२५ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम सन १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात अजुन ०४ आरोपी निष्पन्न झाले आहेत. सदर लॉजचे चालक गुन्हयातील पिडीत महिला यांना पैश्याचे अमिष दाखवुन त्यांचे कडुन वेश्या व्यवसाय करुन घेवुन अनैतिक देह व्यापारातुन मिळणारा पैसा स्वतःकडे घेत असतात. त्यामुळे सदर गुन्हयात त्यांना आरोपी करण्यात आले आहे. यापुर्वी देखील सदर लॉजवर दि.१०/०१/२०२४ रोजी छापा टाकण्यात आला होता त्यावरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२०/२०२४ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम सन १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यावरुन पोलीस प्रशासनाच्या असे निदर्शनास आले की, सदर हॉटेल चालक व मालक यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने व सदर आरोपी हे समाजातील असहाय व निराधार महिलांना अनैतिक देह व्यापरासाठी पुन्हा पुन्हा प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे सार्वजनिक व सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे. तसेच सदर लॉज हा धार्मिक स्थळ श्रीराम मंदिर, पार्श्वनाथ दिंगबर जैन मंदिर, गणपती मंदिर परिसरात आहे.
त्यामुळे उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिनांक ०९/०२/२०२६ रोजी "आदर्श लॉज " रंगोली रोड, वॉर्ड क्रं.५, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर हे आदेशाचे दिनांकापासुन ७ दिवसात कब्जा करणारे यांना निष्कासित करुन आदेश पारित दिनांकापासुन ०१ वर्षाच्या कालावधीसाठी बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पोलीस स्टेशनकडुन सदर लॉज सिलबंद करण्यात आला आहे. प्रशासनाने सामाजिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी हे पाऊच उचलले असल्याचे सांगितले जाते.सदरची कारवाई ही श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री.सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. जयदत्त भवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. नितीन देशमुख, पोसइ दिपक मेढे, पोसई दादाभाई मगरे, पोशि आजीनाथ आंधळे, पोशि अंबादास आंधळे, पोशि सचिन दुकळे, पोशि अमोल पडोळे, पोशि अमोल गायकवाड, गाय पोशि मच्छिद्र कातखडे, मपोशि मिरा सरग श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांनी केली आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015