
*शालेय साहित्य वाटप करून माता रमाई जयंती साजरी*
(महामानव अभिवादन ग्रुप व "वाचाल तर वाचाल" तर्फे विनम्र अभिवादन )
*शालेय साहित्य वाटप करून माता रमाई जयंती साजरी*
(महामानव अभिवादन ग्रुप व "वाचाल तर वाचाल" तर्फे विनम्र अभिवादन )
बीड प्रतिनिधी - त्यागमूर्ती हा शब्द उच्चारल्या बरोबर ज्यांची करुणामय प्रतिमा डोळ्यासमोर येते ती माता म्हणजे त्याग मूर्ती माता रमाई, ज्यांच्या असीम त्यागामुळे दीन दलित वंचित बहुजन व समस्त स्त्रियांचा उद्धार करीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरता खडतर प्रयत्न करून वेळप्रसंगी शेणाच्या गौऱ्या थापून आपला संसार चालविला व ज्या मातेला योग्य औषधोपचार विना चार अपत्य गमवावे लागले तरी आपल्या "साहेब" नावाच्या प्रज्ञा सूर्य डॉ. बाबासाहेब यांच्या शिक्षणाला मदत करणाऱ्या त्याग मूर्तीच्या त्यागामुळेच आज हे सोन्याचे दिवस दिसत आहेत. तेव्हा त्यांचे उपकार व स्मरण कोणीही विसरू शकत नाही तेव्हा त्यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून आपले जीवन क्रमण करणे हेच जयंतीदिनी खरे अभिवादन माता रमाईला ठरेल असे "रमाई" पुस्तकाच्या सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका माया दिवान /सोनवणे यांनी जय भीम बुद्ध विहार पूरग्रस्त कॉलनी बीड येथे स्पष्टपणे प्रतिपादन केले.
महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचाल च्या संयुक्तविद्यमाने आयोजित माता रमाई जयंती कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक वैशाली शिंदे तर प्रमुख वक्ते माया दिवाण /सोनवणे, भारतीय बौद्ध महासभा महिला तालुकाध्यक्ष मंदा मस्के, अंजली वडमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. महामानव आभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, वाचाल तर वाचाल चे अध्यक्ष डी.जी.वानखेडे, समता सैनिकदलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले, प्रा. डॉ.शिवाजी दिवाण प्रियदर्शी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. अशोक गायकवाड व अँड. तेजेस वडवारे यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती. आदर्शाचे दीप प्रज्वलन करून तसेच पुष्प व पुष्पमाला अर्पण करून अभिवान करण्यात आले. पूज्य भिकू श्रामेनर बुद्धघोष यांनी उपस्थितना सामुदायिक त्रिसरण पंचशील दिले. महामानव अभिवादन ग्रुप चालवीत असलेल्या आम्रपाली बुद्ध विहार व जय भीम बुद्ध विहार येथील वर्गातील घटक चाचणीतील प्राविण्य मिळवलेल्या 16 विद्यार्थ्यांना व माता रमाईच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत व वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय आलेल्या 8 विदयार्थना वाचाल तर वाचाल तर्फे शालेय साहित्य ( वही पेन ) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती रमाई यांचे जीवन चरित्र पुस्तके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याग मूर्ती रमाई जयंतीचे औचित्य साधून आम्रपाली बुद्धविहार व जयभिम बुद्ध विहार डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर (पूरग्रस्त कॉलनी) बीड येथे पाच ज्येष्ठ महिलांना रमाई पुरस्कार माया दिवाण लिखित "रमाई" पुस्तक देऊन तर एक ज्येष्ठ पुरुषाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे उत्तम प्रकारे आकलर व्हावे म्हणून महामानव आभिवादन ग्रुपने शालेय साहित्य वाटप कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना हासुरे इंग्रजी ग्रामर हे पुस्तक वितरित केले. कार्यक्रमाप्रसंगी अंजली वडमारे, हिनेदेखील रमाईच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. बीडच्या गान कोकिळा मंदा मस्के यांनी आपल्या सुमधुर आवाजात " थांब रमा थांब एवढे वाचतो ग पान" माता रमाईच्या जीवनावरील गीत गाऊन सर्व उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोपात वैशाली शिंदे यांनी करून महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचाल जेथे जेथे मुलांच्या स्त्रियांच्या प्रबोधन करण्याचा कार्यक्रम घेतील तिथे उपस्थित विद्यार्थी मुलांना संबोधी अकादमी तर्फे आल्पउपाहार देण्याचे जाहीर केले. महामानव आभिवादन ग्रुपला नेहमीच सहकार्य करायचे ठोस आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रेखा गायकवाड, जवळे मॅडम, उमेश चांदणे दांपत्य, मोफत शिकवणी वर्गाचे शिक्षक रवींद्र टेकाळे व सौ टेकाळे,एस.एस.सोनवणे,आ.रडी.चक्रे बहुसंख्य विद्यार्थी पालक उपस्थित होते. सरणातयेने कार्यक्रमाची सांगता झाली.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015