घरकुले बांधणीसाठी शासकीय गायरान व गावठाण जागा मंजुर करुन घेतली...
घरकुले बांधण्यासाठी शासकीय गायरान व गावठाण मधील जागा मंजूर करून घेतली. याबाबतचा मा.उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी माळशिरस जिल्हा सोलापूर यांचा आदेश आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच गायरान मधील जागा घरकुले बांधण्यासाठी मंजूर करून आणली आहे. मी यापूर्वी देखील हा आदेश सोशल मीडियावर टाकला आहे. अनेक लोकांच्या मागणीवरून हा आदेश पुन्हा टाकत आहे. जे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात होऊ शकते ते तुमच्याही तालुक्यात होऊ शकते.यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी व प्रामाणिक पाठपुरावा आवश्यक आहे. मला हजारो फोन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात पण लोक पाठपुराव्यामध्ये कमी पडतात. त्यामुळे घरकुले बांधण्यासाठी शासनाच्या गायरान व गावठाण मधील जागा त्यांना मिळत नाही. त्यामुळे काही घरकुले परत जाण्याचा धोका संभवतो.
परंतु ज्याप्रमाणे आम्ही पाठपुरावा करून गायरान मधील शासकीय जागा घरकुले बांधण्यासाठी आणली याचा प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचा आदेश आणला. असा खडतर पाठपुरावा आपणास देखील करावा लागेल.
वैभव तानाजी गिते
राज्य सचिव
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस