logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अहमदपूर तालुका जि .प . प .स . निकाल जाहीर . कडेकोट बंदोबस्त . प्रशासणाची जय्यत तयारी . नेते कार्यकर्त्याचा जल्लोष

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 निकाल जाहिर . (बालाजी पडोळे - विशेष प्रतिनिधी ) अहमदपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 6 जागेवर भाजपाचे 2 राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी 3 तर एनसीपी शरदचंद्र पवार गट 1 उमेदवार विजयी तर पंचायत समितीच्या 12 जागेवर भाजपा 4, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 5 तर एनसीपी शरदचंद्र पवार गटाचे 2, अपक्ष 1 उमेदवार विजयी अहमदपूर दि.09(बालाजी कारामुंगीकर)ः जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 निकाल जाहीर झाले असुन जिल्हा परिषदेच्या 06 जागेवर भाजपा 02, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 03, एनसीपी शरदचंद्र पवार गट 01, उमेदवार विजयी तर पंचायत समितीच्या 12 जागेवर भाजपा 04, राष्ट्रवादी काँग्रेस पाटी 05 तर एनसीपी शरदचंद्र पवार गट 02 तर अपक्ष 01 उमेदवार विजयी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 09 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (खढख), अहमदपूर येथे मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगारकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया संपन्‍न झाली.
जिल्हा परिषद गटासाठी निवडुण आलेले उमेदवार खंडाळी गटातुन नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) खोमने शितल प्रदीपराव ह्या 7508 मत घेवून विजयी झाल्या आहेत तर भाजपाचे हाडोळती गटातून अ‍ॅड. अजिंक्य प्रकाशराव देशमुख हे 9777 मत घेवून 3156 मतांच्या लिडने विजयी झाले आहेत. शिरुर ताजंब गटातून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे उत्‍तम संभाजी माने हे 12524 मत घेवून 9205 मतांच्या लिडने विजयी झाले आहेत. तर अंधोरी गटातून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे गुंडरे प्रफू लचंद्र निवृत्‍तराव हे 7023 मते घेवून 1544 च्या लिडने विजयी झाले आहेत. किनगाव गटातून भाजपाच्या गुट्टे प्रतीक्षा भागवत ह्या 10112 मते घेवून 6162 मतांच्या लिडने विजयी झाल्या आहेत तर सावरगाव रोकडा गटातून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पाटीच्या अश्‍विन धोंडीराम नागराळे ह्या 9214 मते घेवून 1745 मतांच्या लिडने विजयी झाल्या आहेत.
पंचायत समितीसाठी खंडाळी गणातून भाजपाच्या केंद्रे सुरेखा संतोष ह्या 3840 मतांनी विजयी तर उजना गणातून अपक्ष कासले सुलोचना अशोक 3183 मतांनी विजयी तर हाडोळती गणातुन नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचद्र पवार गटाच्या मुळके अंजनाबाई भिमाशंकर ह्या 4012 मत घेवून विजयी तर कुमठा बु. गणातून भाजपाचे भोसले कृष्णराज हरीदास 5214 मत घेवून विजयी तर वळसंगी गणातून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे बोडके रविंद्र शामराव हे 7243 मत घेवून विजयी तर शिरुर ताजबंद गणातून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे पाटील सुरज बाबासाहेब हे 5795 मते घेवून विजयी तर थोडगा गणातुन नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्या गौड अंजली रामेश्‍वर 3133 मतांनी विजयी तर अंधोरी गणातून राकाँपाचे गुट्टे सुधिर शिवाजी 3705 मतांनी विजयी तर किनगाव गणातून भाजपाच्या मुंडे सुरेखा अशोक ह्या 5213 तर धानोरा बु. गणातुन केंद्रे आयोध्या अशोक ह्या 3900 मते घेवून विजयी तर सावरगाव रोकडा गणातुन नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे गोरटे सुधीर शिवराज हे 4407 मतांनी विजयी तर, हिप्परगा काजळ गणातुन नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे सरवदे कमल माधवराव हे 4779 मतांनी विजयी झाले आहेत.
सदरील मतमोजणीसाठी ही मुख्य हॉलमध्ये 14 टेबल झाली असून, आपत्कालीन स्थितीसाठी 4 टेबल राखीव ठेवण्यात आले होते. तसेच, पोस्टल मतपत्रिकेसाठी स्वतंत्र 3 टेबल आणि 2 राखीव टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. मतमोजणीची प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी प्रत्येक टेबलवर सूक्ष्म नियोजन करण्यात आले होतेे. प्रत्येक टेबलवर खालीलप्रमाणे चार जणांचे पथक कार्यरत होते. 1. एक क्षेत्रीय अधिकारी (डशलीेीं जषषळलशी) 2. एक मास्टर ट्रेनर 3. एक सहाय्यक कर्मचारी 4. एक शिपाई, 5. महत्त्वाच्या जबाबदार्‍या: स्ट्राँग रूम नियंत्रण: नायब तहसीलदार संतोष अनर्थे व संजय भोसीकर. टॅब्युलेशन (ढरर्लीश्ररींळेप): उपकोषागार अधिकारी जी. एन. गोपवाड., संगणक कक्ष: नायब तहसीलदार अभिलाष जगताप, साहित्य पुरवठा: एन. बी. अर्जुने., भोजन व्यवस्था: पुरवठा निरीक्षक एस. आर. जवादे., मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली होती. सर्व मतमोजणी प्रक्रियेचे सीसीटीव्ही चित्रीकरणही करण्यात आले.

330
10751 views

Comment