logo

पवनी शहर शिवसेनेची आढावा, चिंतन बैठक यशस्वी

पवनी शहर शिवसेनेची आढावा, चिंतन बैठक यशस्वी

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- सोमवार ९ फेब्रुवारी ला बेटाळा रेस्ट हाऊस येथे शिवसेना शहर पदाधिकाऱ्यांची आढावा व चिंतन बैठक शिवसेनेचे भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच पार पडली.
बैठकित मागील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आढावा घेत चिंतन मंथन सुद्धा करण्यात आले यावेळी आमदार साहेबांनी सर्वांनी एकत्रित राहण्याच्या सल्ला देत शिवसेनेची ताकद वाढवण्यास प्रत्येकाने शिव सैनिक म्हणून कार्य करावे. समाजात जाऊन सेवाकार्य वाढवा तेव्हाच पक्ष मजबूत होईल आणि आपण सुद्धा सामाजिक राजकीय मजबुत होणारं अश्या सूचना दिल्या. यावेळी शिवसेनेच्या नवनियुक्त शहर प्रमुखाचे आमदार व शहर शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सदर बैठकीत शिवसेनेचे पवनी शहर प्रमुख किशोर पंचभाई, माजी शहर प्रमुख व नगर सेवक देवराज बावनकर, महिला शहरप्रमुख व नगर सेविका सौ. वैष्णवीताई हटवार, युवा सेनेचे शहर प्रमुख विकास सरोदे, नगर परिषद पवनी गटनेते नामदेव सुरकर, नगर सेविका सौ. ज्योतीताई तेलमासरे नगरसेविका, सौ. सोनूताई पंचभाई, शिवसेना नेते व मार्गदर्शक नरेश बावनकर, शिवसेना नेते बंडूभाऊ हटवार, अनिल धकाते, श्रीकांत भोगे, मनीषभाऊ आचार्य, संजय वैकुंठपुरी, श्री डिंकुजी सावरकर, गणेश जांभूळे, सोनुभाऊ कोरेकर, आकाश दुर्गे, सौ. रीताताई मेश्राम इत्यादी उपस्थित होते.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
235 views