logo

१० व ११ ला सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन


१० व ११ ला सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- आदर्श बहुउद्देशिय मंडळ, आंबेडकर वार्ड, भंडारा व्दारा संचालित सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा आंबेडकर वार्ड भंडारा येथे मंगळवार ‌व बुधवार दिनांक १० व ११ फेब्रुवारी २०२६ ला वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी २०२६ ला ११.३० वाजता हेमराज तांडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श बहुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष जागेश्वर साठवणे राहतील. प्रमुख पाहुणे शाम बावणे, आशिष बागडे, आवेश सैय्यद, सौ. दिपाली दुधपचारे, सौ. रेखा बुराडे, आदर्श बहुउद्देशिय मंडळाचे सचिव मनोज वाडीभरमे, विजय मेश्राम, सौ. संध्या गणवीर, सौ. ज्योती उके, सौ. प्राची घोडसे, सौ. भारती रोहनकर, सौ. पौणिमा रार्घोते, सौ. भारती हारगुडे, आदर्श बहुउद्देशिय मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती प्रेमाबाई वाडीभस्मे, सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा संस्था प्रतिनिधी सौ. निशाताई साठवणे, भाग्यश्री साठवणे, सौ. सुनंदा एम. वाडीभरमे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बक्षिस वितरण बुधवार दि. ११ फेब्रुवारी २०२६ ला दुपारी १ वाजता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श बहुउद्देशिय मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती प्रेमाबाई वाडीभस्मे, प्रमुख अतिथी म्हणून संस्था सदस्या श्रीमती आशाताई वाडीभरमे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, भोजराम मोहरकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी परिसरातील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी, शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापिका सौ. सुनंदा एम. वाडीभस्मे, सुनिता गायधने, कु. स्वाती वरकडे, सौ. नुतन ताम्रकार, सौ. मनिषा गभणे, सौ. प्रियंका मेश्राम, सौ. रोहिणी गजभिये यांनी केले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
158 views