logo

Aima midiya jan jan की आवाज दिनांक 10.2.2026 am 9.13 मेष ( ८ ते १४ फेब्रुवारी २०२६ ) मेष : प्रकृती जपा दिनांक १०, ११ हे संपूर्ण दोन दिवस व १२ तारखेला

Aima midiya jan jan की आवाज दिनांक 10.2.2026 am 9.13
मेष
( ८ ते १४ फेब्रुवारी २०२६ )
मेष : प्रकृती जपा

दिनांक १०, ११ हे संपूर्ण दोन दिवस व १२ तारखेला दुपारपर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला कसा जाईल ते पाहा. कारण या दिवसांत आपल्याला ज्या गोष्टी करायच्या नाहीत, त्याच गोष्टी करण्याचा मोह निर्माण होईल. परिणामी नुकसान होऊ शकते. अशा वेळी महत्त्वाच्या कामासाठी घाई करू नका. चांगल्या कामासाठी उशीर झाला तरी चालेल, पण धीर धरा. भावनिक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या दिवसांमध्ये महत्त्वाचे काम करायला हरकत नाही. व्यावसायिक नफा कमी राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या आदेशानुसार कामाचे नियोजन करावे लागेल.

अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी संवाद साधाल. धार्मिक कार्य पार पाडाल. प्रकृती जपा.

शुभ दिनांक : ८, १३

महिलांसाठी : इतरांवर अवलंबून राहू नका.


taurus
वृषभ
( ८ ते १४ फेब्रुवारी २०२६ )
वृषभ : सहनशीलता ठेवा

षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण दुधात मिठाचा खडा टाकणारे आहे. त्यामुळे आळीमिळी गुपचिळी असे वातावरण ठेवा म्हणजे नुकसान होणार नाही. समोरचा तुम्हाला एखादा सल्ला देत असेल तर तो ऐकून घ्या. त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. इतरांनी काय करावे, काय करू नये यासाठी तुम्ही विचार करत बसू नका. शिवाय इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका.

आपले काम भले आणि आपण भले हे सूत्र लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीत सहनशीलता ठेवा म्हणजे त्रास होणार नाही. व्यवसायात जे चालले आहे ते ठीक असे समजून पुढे चला. वायफळ खर्च न केलेला चांगला. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. कुटुंबामध्ये एकोपा कसा राहील ते पाहा. मानसिकता जपा. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १०, ११

महिलांसाठी : विचार करून बोला.


gemini
मिथुन
( ८ ते १४ फेब्रुवारी २०२६ )
मिथुन : बेकायदेशीर गोष्टी टाळा

दिनांक १०, ११ हे संपूर्ण दोन दिवस व १२ तारखेला दुपारपर्यंत असे हे अडीच दिवस चढउताराचे राहतील, त्यामुळे या कालावधीत आपला ज्या गोष्टीशी संबंध नाही अशा गोष्टींच्या नादी लागू नका. बेकायदेशीर गोष्टी टाळा. काही वेळेला स्पष्ट बोलण्यामुळेसुद्धा नुकसान होते हे लक्षात ठेवा, त्यामुळे सध्या कोणाला काही बोलायला जाऊ नका. आपला स्पष्टवक्तेपणा आपल्या जवळच ठेवा म्हणजे नुकसान होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये शुभ गोष्टींची सुरुवात करायला हरकत नाही.

व्यवसायात भागीदारी करार करायला हरकत नाही. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. आर्थिक व्यवहार जपून करा. मुलांची प्रगती होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ दिनांक : ८, ९

महिलांसाठी : आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
मानसिकता जपा. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १०, ११.

महिलांसाठी : विचारपूर्वक निर्णय घ्या.

Sagi
धनु
( ८ ते १४ फेब्रुवारी २०२६ )
धनू : शब्द जपून वापरा
दिनांक १०, ११ आणि १२ या तीन दिवसांत जपून पावलं टाकावी लागतील. कारण या दिवसांत काही गोष्टी मनाविरुद्ध होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही अखंड तांडव निर्माण कराल आणि याचा त्रास तुम्हालाच होईल. त्यामुळे शांत राहिल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात ठेवा. बोलताना दोन शब्द कमी बोला. शिवाय शब्द जपून वापरा. दुसर्‍यांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. आपले काम इतरांनी करावे ही अपेक्षा मनामधून काढून टाका. कारण सध्या असे दिवस आहेत की आपले काम आपल्यालाच करावे लागणार आहे. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. चांगल्या दिवसांमध्ये कामाचे नियोजन करा, ते यशस्वी होईल. व्यवसायात चाललेल्या घडामोडींत बदल होतील. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे गुंतून राहावे लागेल. खर्च कसे कमी होतील ते पाहा. राजकीय क्षेत्रात सध्या रस वाटणार नाही. जोडीदाराची साथ मिळेल. योग साधनेला महत्त्व द्या.

शुभ दिनांक : ८, १३.

महिलांसाठी : स्वत:वर नियंत्रण ठेवा.


capri
मकर
( ८ ते १४ फेब्रुवारी २०२६ )
मकर : प्रयत्न वाढवा
१२ तारखेला दुपारनंतर दिनांक १३ , १४ या अडीच दिवसांत कोणतेही काम करताना काळजी घ्या. आपल्यामुळे दुसर्‍याला त्रास होईल असे काही करू नका. कारण तुम्हाला नेहमी कोणतेही काम करताना मनामध्ये शंका निर्माण होत असते आणि ही शंका निर्माण झाली की समोरच्यावर त्याचा राग निघतो. परिणामी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. मनामध्ये कोणतीही शंका घेऊ नका. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीला महत्त्व देऊ नका. तुमच्या कामात प्रयत्न वाढवा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात मोठी उलाढाल सध्या तरी टाळा. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्यावे. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब राहील. समाजसेवेचे पुण्य पदरी पडेल. नवीन ओळखीचा फायदा होईल. घरगुती वातावरण ठीक राहील. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : १०, ११

महिलांसाठी : अंदाजे बोलणे टाळा.


Aqua
कुंभ
( ८ ते १४ फेब्रुवारी २०२६ )
कुंभ : भाग्योदय होईल
भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण अतिशय लाभदायक राहील. सप्ताहात जेव्हा असे ग्रहमान असते, तेव्हा आपल्यापुढे फार मोठे आव्हान नसते. मग ते काम कोणतेही असो. अगदी सुरळीतपणे आणि व्यवस्थित काम पार पडते. आपल्यामुळे इतरांना त्रास होत नाही आणि चांगले प्रस्ताव आपल्यासमोर येतात. हे प्रस्ताव आगामी काळासाठी चांगले असतील. चांगल्या गोष्टींसाठी वेळ यावी लागते असे म्हणणे सध्या तरी योग्य राहील. कारण सध्या तुमचा भाग्योदय होणार आहे.

अनेक चांगली कामे तुमच्या हातून होतील. चांगल्या दिवसांमध्ये चांगल्या घडामोडी होतील. व्यवसायात लाभ होईल. नोकरदार वर्गाचे काम सुरळीत चालू राहील. आर्थिक लाभ होईल. आरोग्य ठणठणीत राहील.

शुभ दिनांक : ८, १४.

महिलांसाठी : आपले मत इतरांना पटणारे असेल.


pices
मीन
( ८ ते १४ फेब्रुवारी २०२६ )
मीन : बदल स्वीकारा
दिनांक ८, ९ हे दोन दिवस अनुकूल नाहीत. त्यामुळे या दोन दिवसांत महत्त्वाची कोणतीही कामे करू नका. प्रत्येक वेळी घाई गडबडीने आपण काम करत राहतो आणि नुकसान झालेले कळून येत नाही. त्यामुळे या दिवसात तरी कोणतीही घाई गडबड करू नका. एखादे काम उशिरा झाले तरी चालेल, पण विचार करून काम करा. काही अचानकपणे झालेले बदल आपल्याला आवडत नसतात. पण परिस्थितीनुसार बदल स्वीकारणे हा एक पर्याय आहे हे लक्षात ठेवा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात उत्पन्नाचा मार्ग चांगला राहील.

नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ होतील. समाजसेवेतून एक प्रकारचा आनंद मिळेल. नातेवाईकांशी संवाद साधाल. धार्मिक कार्यात सहभाग राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

शुभ दिनांक : १०, ११.

महिलांसाठी : सकारात्मक विचार करा.

5
89 views