logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रस्तरीय समितीची बैठक संपन्न... प्रतिनिधी राविराज शिंदे .



अहिल्यानगर, दि. ९ :- पारनेर - नगर विधानसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबविण्यासाठी व कामांचा आढावा घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या क्षेत्रस्तरीय समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली.

या बैठकीत शेत रस्त्यांच्या कामांना गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार काशिनाथ दाते होते. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर उपस्थित उपस्थित होते.

बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या समस्या व शेत रस्त्यांची सद्यस्थिती यावर विचारविनिमय करण्यात आला. 'शेतरस्ते म्हणजे केवळ रस्ते नसून तो शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग आहे,' या तत्त्वावर भर देत, योजनेतील कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा प्रशासनाकडून होऊ नये, अशा स्पष्ट सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. योजनेची व्याप्ती व महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.

#बळीराजाशेतरस्ते #पाणंदरस्ते #अहिल्यानगर #पारनेर #नगर #शेतकरीप्रगती #ग्रामीणविकास #काशिनाथदाते #मुख्यमंत्रीयोजना #MaharashtraAgriculture #RuralConnectivity #FarmerFirst #DevelopmentNews

7
1206 views

Comment