logo

विद्यार्थ्यांनी दडपण न बाळगता सकारात्मक पणे परिक्षेला सामोरे जावे . जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे अवाहन .( बारावी परिक्षा आजपासून प्रारंभ .)

_इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज_

*विद्यार्थ्यांनी दडपण न बाळगता सकारात्मकपणे परीक्षेला सामोरे जावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*

• पालकांनी योग्य मार्गदर्शन, समुपदेशन करण्याचे आवाहन
( बालाजी पडोळे विशेष प्रतिनिधी )
लातूर, दि. ०९ : जिल्ह्यात आजपासून इयत्ता बारावी परीक्षेस प्रारंभ होत असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना, गैरप्रकाराला बळी न पडता, आपण वर्षभर केलेला अभ्यास व घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर सकरात्मकपणे परीक्षेला सामोरे जावे. कोणतेही दडपण न बाळगता योग्य रीतीने उत्तर पत्रिकेत मांडणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

परीक्षा केंद्रावर अचानकपणे भेट देण्यासाठी भरारी पथकाची व कायमस्वरूपी बैठे पथकाची व्यवस्था करण्यात आली असून, कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक दक्षता घेतली आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेस सामोरे जाण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन व समुपदेशन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास सबंधित विद्यार्थी, पर्यवेक्षक व केंद्र संचालक यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणारआहे. तसेच परीक्षा कालावधीत, परीक्षा केंद्रावर दूरदृष्य प्रणालीद्वारे देखरेख करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात स्वतंत्र संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी राहुल कुमार मीना यांनी दिली आहे.

जिल्ह्यात १०१ परीक्षा केंद्रांवर इयत्ता बारावीची परीक्षा होणार असून ३६ हजार ५११ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. प्रत्येक परीक्षा कक्षात, परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांनी काय करावे, काय करू नये, याबाबतच्या सूचना प्रत्येक परीक्षा केंद्राच्या सूचनाफलकावर लावण्यात येणार आहेत. तालुकास्तर, जिल्हा परिषद स्तरावर व जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर झूम ॲपचा वापर करुन वॉर रुम स्थापित करण्यात येणार असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर त्रिस्तरीय नजर व निगराणी ठेवली जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रास व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात असेल आणि परीक्षा कालावधीत सर्व परीक्षा केंद्रवार व परिसरामत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती यांनी दिली.

1
0 views