logo

ग्रीन नेचर फाउंडेशन तर्फे वर्ल्ड वेटलँड डे ला वन विभागाचा उत्स्फूर्त सहभाग


ग्रीन नेचर फाउंडेशन तर्फे वर्ल्ड वेटलँड डे ला वन विभागाचा उत्स्फूर्त सहभाग

सोनमाळा, गुढरी व रावणवाडी तलावावर अनेक दुर्मिळ स्थानांतरीत बदकाचे निरीक्षण


विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- लाखनी येथील ग्रीन नेचर फाउंडेशन तर्फे मागील २५ वर्षापासून स्थानांतरीत पक्षी निरीक्षण केले जात असून यावर्षी सुद्धा लाखनी वन क्षेत्राअंतर्गत सोमनाळा व गूढरी या दोन्ही तलावावर स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण वनविभाग लाखनी यांचे सहकार्याने नुकतेच करण्यात आले. या उपक्रमात ताजुश शरिया कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
सर्वप्रथम सोनमाळा तलावावर प्रा. अशोक गायधने, अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर, भैय्याजी बावनकुळे, शिवलाल निखाडे तसेच वनक्षेत्रपाल अंकुश धनविजय, वनक्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले, बिटरक्षक डी. एस. बोरकर व त्रिवेणी गायधने, तसेच बिटरक्षक आर. व्ही. लखवाल, वनमजूर दुधराम शेंडे, यादव लांजेवार व वाहनचालक अरविंद बडगे यांचे सहकार्याने तर जांभळी राऊंड अंतर्गत गुढरी तलावावर वनक्षेत्र सहाय्यक आर. जी. मेश्राम, एन.डी सिनकर क्षेत्र सहाय्यक चिचगाव एफ डी सी एम, वनकर्मचारी सुधीर कुंभरे, मानसिंग बिसने, बी.बी. निचित, वनमजूर आर. डी. मते, डी. ए. रामटेके यांच्या तसेच ताजूश शरिया कोचिंग क्लासेसचे संचालिका मिनाझ मोटलानी यांच्या सहकार्याने गुढरी तलावावर स्थलांतरित बदक व इतर पक्षी निरीक्षण करण्यात आले. यावेळी ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी दोन्ही ठिकाणी असलेले स्थलांतरित पक्ष्यांची ओळख पटवून दिली.
यावेळी उपस्थितांना कलहंस बदक, गढवाल, गार्गेनी, तरंग तसेच दुर्मिळ नकटा बदक याशिवाय रंगीत करकोचा, पट्टकादंब बदक, मोठी लालसरी, छोटी लालसरी, शेंडी बदक, पाणडूबी यासमवेत अनेक स्थलांतरित व स्थानिक बदक तसेच पक्षी पक्षी नोंदवण्यात आले. याचबरोबर रावणवाडी तलाव व सोनमाळा तलावावर पट्टकादंब निरीक्षण करतेवेळी व महाराष्ट्र ग्रामीण बँक चंद्रपूरचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजकुमार जाधव, प्रदीप सोमवंशी, चुन्नीलाल लोथे हे व सौंदड तलावावर एम एस आर शाद, युवराज बोबडे, रोशन बागडे हे सुद्धा सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांना ग्रीनफ्रेंडसचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने तसेच वनक्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले व राज मेश्राम यांनी जागतिक पाणथळ दिनाविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना पाणी व जैवविविधता यावर मार्गदर्शन केले. प्रवास व्यवस्था सांभाळण्याचे कार्य लाखनी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अंकुश धनविजय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वनकर्मचारी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृतीशील नगरसेवक संदीप भांडारकर, मुंबई पोलिस उपआयुक्त नेताराम मस्के, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ मनोज आगलावे, देशमुख एक्स रे व सोनोग्राफी क्लिनिक सेंटरचे संचालक डॉ. प्रमोद इमदेव देशमुख, नाना वाघाये, डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे, डॉ. छगन राखडे, डॉ. दिपक नवखरे, सेवानिवृत प्राचार्य अशोक हलमारे व माधवराव भोयर, सावरी सरपंच सचिन बागडे, रमेश गभने, डॉ. दिलीप अंबादे, निर्वाण इलेक्ट्रिकल्सचे भूपेश निर्वाण, प्राचार्य प्रदिप गायधनी व शिक्षिका वैशाली गायधनी यांनी अथक परिश्रम घेतले. तर पक्षी निरीक्षण करण्यास आलेले ताजुश शरिया कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी शंतनु कांबळे, अधिराज जाधव, ग्लोरी मेश्राम, खवाईश टहिल्यानी, असीया आकबानी, भुविष्का थोटे, हेजल क्षीरसागर, मिताली गायधनी, जान्हवी निर्वाण, इकरा आकबानी, जय सातपुते, खिमांशू भोयर, सक्षम पडोळे, जिशान कनोजे, प्रिन्स झलके, उत्कर्ष गाढवे, तारुण्य काटगाये, अयात कनोजे, पारुल खेडीकर, अश्मीरा आकबानी, विश्वजा शिनगारे, कनक गुरुनानी, आरोही कावळे, अन्विक्षा थोटे इत्यादींनी स्थलांतरित पक्षीगणनेत सहभाग नोंदविला होता.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
527 views