logo

१९ पासून आदिशक्ती शितला माता मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन


१९ पासून आदिशक्ती शितला माता मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- येथील आदिशक्ती शितला माता मंदिर खामतलाव येथे चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन गुरुवार दिनांक १९ मार्च ते २७ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आले आहे.
नवसाला पावणारी म्हणजे शितला माता होय. ६५ वर्षापूर्वी भंडारा येथील हिंदू व मुस्लीम बांधव एकत्र येऊन आदिशक्ती शितला माता मंदिराची स्थापना करण्यात आली होती. खामतलाव येथे अश्विनी नवरात्र, देव दिवाळी, नवग्रह व शनि जयंती तसेच चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. आता चैत्र नवरात्र निमित्ताने घट स्थापना गुरूवार दिनांक १९ मार्च २०२६ ला सकाळी ९ वाजेपासून १२ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. अष्टमी पूजा व हवन कार्य बुधवार दिनांक २५ मार्च २०२६ ला दुपारी ४ वाजता होईल. घट विसर्जन शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ ला सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत होणार आहे. तसेच यादरम्यान दैनंदिन आरती सकाळी ७ व सायंकाळी ७ वाजता शितला माता मंदिर येथे होणार आहे.
तरी जिल्ह्यातील भाविक भक्तांनी जास्तीत -जास्त संख्येने उपस्थित राहून चैत्र नवरात्र उत्सवाचा लाभ घ्यावा तसेच ज्या भाविक- भक्तांना घटस्थापना करायची आहे. त्यांनी शितला माता मंदिराचे कोषाध्यक्ष धनराज धुर्वे, मोबाईल नंबर ९८६०४६५३७९ यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन शितला माता मंदिर देवस्थान समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

9
347 views