logo

महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती बीड शहरात उत्साहात साजरी


महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती बीड शहरात उत्साहात साजरी

धम्मध्वज, भव्य रॅली, धम्मदेसना व व्याख्यानाने कार्यक्रमास लाभले वैचारिक अधिष्ठान

बीड | प्रतिनिधी :
महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती बीड शहरात व तालुक्यात दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात, आनंदात व धम्ममय वातावरणात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा बीड यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास बौद्ध उपासक-उपासिका, सामाजिक कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त सकाळी ठीक ९ वाजता भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा पश्चिम महिला अध्यक्षा आयुष्यमती अरुणाताई निसर्गण यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक धम्मध्वज वंदना घेण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा सरचिटणीस प्रा. गौतम खेमाडे यांनी उपस्थितांना त्रिशरण-पंचशील दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे बीड जिल्हा पश्चिम अध्यक्ष महालिंग निकाळजे उपस्थित होते.जयंतीनिमित्त भव्य व शिस्तबद्ध रॅलीचे सुंदर आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली ही रॅली भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा पश्चिम कार्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. रॅलीत बौद्ध उपासक-उपासिका,भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक दल, शक्य पोलीस संघ तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महालिंग निकाळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. समता सैनिक दलाच्या वतीने ध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर भंतेजींच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना, भीमस्तुती व धम्मदेसना झाली.
मुख्य कार्यक्रमानंतर भारतीय बौद्ध महासभा बीड कार्यालयात वामनराव निकाळजे बापू (संस्कार उपाध्यक्ष, बीड जिल्हा) यांनी महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर सखोल व श्रवणीय व्याख्यान दिले. तसेच समता सैनिक दलामध्ये सक्रिय महिला व पुरुष समता सैनिकांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आयुष्यमती मंदाताई मस्के यांनी रमाई यांच्या जीवनावर आधारित भावस्पर्शी गीत सादर केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपीनाथ बनसोडे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाची सांगता सरणतय घेऊन करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views