
कत्तलीकरीता बांधुन ठेवलेल्या 5 गोवंशीयांची सुटका;श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई...
कत्तलीकरीता बांधुन ठेवलेल्या 5 गोवंशीयांची सुटका;श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 08/02/2026 रोजी रात्री 12/00 वा.चे सुमारास पोनि. नितीन देशमुख यांना गुप्त बातमी मिळाली की, कुरेशी मोहल्ला वॉर्ड नं.02, श्रीरामपूर येथे एका पडक्या घराच्या आडोशाला कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशीय जनावरे हे त्यांची चारा पाण्याची सोय न करता निर्दयीपणे बांधुन ठेवलेले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोनि.नितीन देशमुख यांनी तात्काळ तपास पथकास सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने रात्री 12/30 वा. सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे खालील वर्णनाची व किंमतीची गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांची चारा पाण्याची सोय न करता निर्दयीपणे बांधुन ठेवलेले मिळुन आली.
1)1,50,000/- रु.किं.ची काळे, पांढऱ्या रंगाची गोवंशीय जातीची 3 जर्शी गायी प्रत्येकी 50,000/- रु.किं.अं.
2)25,000 /- रु.किं.ची काळया रंगाची एक जर्शी कालवड किं.अं.
3)25,000/- रु. किं. चा एक तांबड्या रंगाचा गावरान गोऱ्हा किं.अं. 2,00,000/- रु एकुण.
वरील वर्णनाची व किंमतीची गोवंशीय जनावरे ही सदर ठिकाणी कोणी बांधली आहेत याबाबत चौकशी केली असता सदरची गोवंशीय जनावरे हे, इसम नामे अजमद अजिज कुरेशी, रा. कुरेशी मोहल्ला,वॉर्ड नं.02 श्रीरामपूर जि. अहिल्यानगर याने कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधले असल्याची माहिती मिळाल्याने त्याचे विरुध्द श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुन्हा रजि.क्र. 88/2025 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारीत कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (ब) 9, सह प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंधक करण्याबाबत अधिनियम 1960 चे कायदा कलम 11(च), 11(ज), 11(झ) प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोकॉ/संभाजी खरात, पोकॉ/रविंद्र शिंदे,पोकॉ/अमोल पडोळे, पोकॉ/अजित पटारे, पोकॉ/सचिन दुकळे, पोकॉ/रामेश्वर तारडे, पोकॉ/सागर बनसोडे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोना/ भैरवनाथ अडागळे हे करीत आहेत.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015