logo

AIMA MEDIA एक्झिट पोल पुणे जिल्हा ZP-PS निवडणूक: आंबेगावमध्ये घड्याळ आघाडीवर, काही ठिकाणी कमळाची टक्कर.

लोणी प्रतिनिधी: - तेजस वाळुंज

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर जिल्हाभरात निकालापूर्वीचे राजकीय गणित रंगले आहे. अधिकृत एक्झिट पोल जाहीर नसला तरी स्थानिक राजकीय कार्यकर्ते व मतदानाच्या ट्रेंडवरून मिळालेल्या अंदाजानुसार पुणे जिल्हा परिषदेत यावेळी घड्याळ चिन्हाचा गट आघाडीवर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 73 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी गटाला सुमारे 28 ते 32 जागा मिळू शकतात, तर भाजप 22 ते 26 जागांदरम्यान राहू शकतो. शिवसेना 6-8, काँग्रेस 4-6 आणि अपक्ष 3-5 जागांवर प्रभाव टाकू शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
आंबेगाव तालुक्यातही चित्र जवळपास असेच दिसत असून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही पातळीवर घड्याळ गट मजबूत मानला जात आहे. आंबेगाव ZP सर्कलमध्ये राष्ट्रवादी गट 2 ते 3 जागांवर बाजी मारू शकतो, तर भाजप 1 ते 2 जागांवर टक्कर देत आहे. उर्वरित जागांवर सेना किंवा अपक्ष किंगमेकर ठरू शकतात.
जारकरवाडी-पारगाव जिल्हा परिषद गटात घड्याळ चिन्हाचा उमेदवार आघाडीवर असल्याचा अंदाज स्थानिक स्तरावर व्यक्त केला जात आहे. भाजप उमेदवाराकडून कडवी टक्कर असली तरी मतविभाजनामुळे काँग्रेस, शिवसेना व अपक्ष उमेदवार मागे पडू शकतात, असे चित्र मतदानानंतर दिसत आहे.
एकूणच आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी गट आघाडीवर, भाजपकडून जोरदार आव्हान आणि काही ठिकाणी अपक्ष निर्णायक ठरण्याची शक्यता अशी निवडणुकीनंतरची प्राथमिक राजकीय हवा आहे. अधिकृत निकाल लागल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार असले तरी जिल्ह्यात सत्ता समीकरणात घड्याळ गटाला आघाडी मिळण्याची शक्यता सध्या व्यक्त होत आहे.

0
12 views