logo

लोणी- धामणी येथे अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात सुरुवात; आज दुसरा दिवस

प्रतिनिधी:- तेजस वाळुंज.

लोणी येथे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाला शनिवार (दि.७) पासून भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली असून आज रविवार (दि.८) हा सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. यंदा सप्ताहाचे ५३ वे वर्ष असून ग्रामस्थ व भाविकांच्या मोठ्या सहभागात कार्यक्रम पार पडत आहेत.
सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी पहाटे काकडा आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली. मंदिर परिसरात अखंड वीणा वादन सुरू असून दिवसभर हरिनामाचा गजर घुमत आहे. दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, तर रात्री ७ ते ९ हरिकीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हरिकीर्तनानंतर रात्री ९ वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत हरिजागर सुरू असतो. सप्ताह काळात विविध मान्यवर प्रवचनकार व कीर्तनकार आपले विचार मांडत आहेत. ह.भ.प. बबन महाराज सिनलकर, ह.भ.प. उज्वला सुक्रे, ह.भ.प. महादेव महाराज बढेकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज ढगे पाटील, ह.भ.प. हनुमंत महाराज पोखरकर, ह.भ.प. श्रीराम महाराज वाळूंज, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज थोरात, ह.भ.प. नंदा आढाव व ह.भ.प. किसन महाराज तांबे यांची अनुक्रमे प्रवचने होत आहेत.
कीर्तन मालिकेतील पहिल्या दिवशी ह.भ.प. वैभव महाराज राक्षे (देहू) यांनी हरिकीर्तन सादर केले. आज दुसऱ्या दिवशी (दि.८) ह.भ.प. गणेश महाराज घोडेकर (कळंब) यांचे कीर्तन होणार आहे. पुढील दिवसांत सोमवार (दि.९) ह.भ.प. जनार्दन महाराज रजपूत (धुळे), मंगळवार (दि.१०) ह.भ.प. भरत महाराज थोरात (राजगुरुनगर), बुधवार (दि.११) ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत (डोंबिवली), गुरुवार (दि.१२) ह.भ.प. दादा महाराज वायसळ (गंगापूर), शुक्रवार (दि.१३) ह.भ.प. डॉ. विकासानंद महाराज मिसाळ (पिंपळगाव वाघा) आणि शनिवार (दि.१४) ह.भ.प. सुदर्शन महाराज शास्त्री (पाथर्डी) यांची कीर्तने होणार आहेत. तसेच रविवार (दि.१५) ह.भ.प. बाळासाहेब महाराज रंजाळे (श्रीरामपूर) यांचे कीर्तन आणि सोमवार (दि.१६) सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत ह.भ.प. लक्ष्मण महाराज नागरे (देवगड, नेवासा) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
सप्ताहानिमित्त मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होत असून दररोज महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक उपस्थित राहत आहेत. ग्रामस्थ व आयोजक समितीच्या वतीने स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, हरिनामाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा प्रसाद घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. सप्ताहामुळे परिसरात भक्ती, नामस्मरण आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून लोणी-धामणी गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे.

14
1098 views