
Aima midiya jan jan ki avaj
दिनांक 7.2.2026
एक्सप्रेस-वे’ची कोंडी भयानक’’, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडवर…
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेव
Aima midiya jan jan ki avaj
दिनांक 7.2.2026
एक्सप्रेस-वे’ची कोंडी भयानक’’, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडवर…
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील भयानक वाहतूक कोंडीची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडवर आले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे आश्वासन दिले आहे.पुणे : ‘मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस-वे’वर झालेली वाहतुक कोंडी भयानक होती. सातत्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात होतो. सगळी यंत्रणा तिथे काम करत होती. त्या सगळ्यांच्या संपर्कात होतो,’ अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.सगळीकडून नागरिक अडकले, त्रस्त झाले. असा प्रकार भविष्यात होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. त्यासाठीची यंत्रणा त्या-त्या ठिकाणी उपलब्ध असावी. यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून माझीसुद्धा ही जबाबदारी आहे. भविष्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही, याची काळजी घेणार आहोत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (वॅमनीकॉम) च्या पदवीदान समारंभानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कार्यक्रमाला राष्ट्रीय सहकार विकास परिषदेच्या सचिव मीनू शुक्ला पाठक उपस्थित होत्या.सहकारातून समृद्धीकडे’
‘देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था आहे. आता लवकरच आपण तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहोत. देशात साडेआठ लाख सहकार संस्था आहेत. ३० कोटींपेक्षा अधिक नागरिक या क्षेत्राशी जोडले गेलेत. त्यामुळे देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी नवे सहकार मंत्रालय सुरू करण्यात आले.
पंतप्रधानांनी ‘सहकारतून समृद्धी’चा कानमंत्र दिला आहे. आता सहकार क्षेत्रात क्रांतीकारी बदल होत आहेत. कृषी व्यवसाय नव्या रूपात येत आहेत. सहकारी समित्यांचे जाळे अधिक सशक्त होत आहे. आगामी काळात सहकारासाठी किमान १७ लाख प्रशिक्षित तरुणांची गरज लागणार आहे,’ असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.पुण्याला देशातील सर्वांत चांगले शहर म्हणून विकसित करणार
‘आगामी काळात समान पाणीपुरवठा योजना, वाहतुक कोंडीचा प्रश्न, नद्यांचे दोन्ही प्रकल्प, घनकचरा व्यस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इत्यादी प्रश्नांवर काम करावे लागणार आहे. शहर, उपनगर आणि समाविष्ट गावांचा एकत्रितपणे विचार करून एक सर्वसमावेशक, संतुलित विकास करण्यात येईल. पुण्याला देशातील सर्वांत चांगले शहर बनवण्यासाठी चांगले काम करावे लागेल,’ असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
‘महापौर, उपमहापौर निश्चित झालेत. येत्या पाच वर्षात प्रत्येकाला पक्षाकडून संधी मिळेल. आमच्याकडे भांडणं होत नाहीत. पक्ष नेतृत्वाने दिलेला आदेश, सगळ्यांना मान्य असतो. तो मान्य करावाच लागतो. पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपचा महापौर केला. त्यासाठी पुणेकरांचे आभार मानतो. त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी काम करू,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.
हेही वाचा
दादांच्या निधनाचे राजकारण नको’
‘अजितदादा नाहीयेत. त्याचा आपापल्या पद्धतीने आपापल्या राजकारणासाठी कोणी वापर करू नये, सत्य काय ते लवकरच समजेल. मुख्यमंत्री या प्रकरणात स्वत: लक्ष घालत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यातील डेटाचे विश्लेषण होईल आणि त्यानंतर अहवाल येईल. आता रोहित पवार आणि इतरांना बोलायचे स्वातंत्र्य आहे. शेवटी, त्यांचे काही म्हणणे असल्यास ते मांडतील,’ असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी सांगितले.
‘अजितदादांसारखा मोठा नेता गेला. राज्याचे मोठे नुकसान झाले. पुणे जिल्ह्याचे नुकसान झाले. आज आपण सगळेच त्या दुःखात आहोत. कृपा करून, अशा दुःखद प्रसंगाचे राजकारण करू नये. मी कोणाचे नाव घेत नाही. मात्र, गेल्या पाच-सहा दिवसांपासून जे काय घडतंय, कोणीही काहीही बोलते आहे. चौकशी होईल, अहवाल येतील. त्यानंतर बोला; पण आता या विषयावर कोणीही बोलू नका,’ असे आवाहनही त्यांनी केले.