logo

नियमभंग व वाहतुक कोंडीस कारणीभूत वाहनचालकांविरुध्द कारवाई...


नियमभंग व वाहतुक कोंडीस कारणीभूत वाहनचालकांविरुध्द कारवाई...

नगर (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ०६/०२/२०२६ रोजी पत्रकार चौक येथे नाकाबंदी करुन वाहतुक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली असून पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये अहिल्यानगर शहरातील पत्रकार चौक येथे आचानक नाकाबंदी करुन नाकाबंदी दरम्यान वाहतुक नियमभंग करणारे वाहनचालकांविरुध्द कारवाई करण्यात आली.तसेच शहरातील कायनेटीक चौक येथे वाहतुक कोंडी करणा-या,अवैध वाहतुक करणा-या वाहनचालकांविरुध्द ,विना सिट बेल्ट वाहन चालवणे, काळी काच-१७ केसेस व दंड १८५००, मोबाईल टॉकींग , रहदारीस अडथळा, विना लायसन्स, तसेच विना नंबर प्लेट, फ्रंट सीट प्रवासी बसवले व मोटार वाहन कायद्याप्रमाणे ३० केसेस करण्यात आल्या आहे.
याबाबत १२००/- रु दंड रोख वसुल करण्यात आलेला असुन अनपेड दंड २४५००/- रु अशी कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह ३ केसेस व अवैध प्रवासी वाहतुक करणारे ३ वाहनांवर करवाई करण्यात आली. सदरची विशेष मोहीम यापुढेदेखील सातत्याने सुरु राहणार असुन मा. पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर तसेच अहिल्यानगर पोलीस दल यांचे वतीने सर्व वाहन चालक यांना आवाहन करण्यात येते की, आपण मोटार वाहन कायदयाचे पालन करुन आपले वाहन चालवावे. सर्व वाहनचालकांनी वाहतुक नियमांचे पालन करुन पोलीस दलास सहकार्य करावे.
सदर कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलूबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, डॉ. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकरी, अहिल्यानगर शहर विभाग यांचे आदेशान्वये शहर वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि / बाबासाहेब बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अधिनस्त पोलीस अधिकारी / अंमलदार पोसई कैलास बोठे, सफौ. रामराव शिरसाट, सफौ/गणेश कर्डीले, पोहेकॉ / विनायक कांबळे, पोहेकॉ/जहीर शेख, पोशि. मधुकर ससे, पोकॉ/ आदिनाथ जपकर, पोकों/ सुरज शिंदे, पोकॉ/ राहुल काळे, पोकॉ विकास गडदे, मपोकॉ/ मनिषा पुरी, मपोकॉ/सना सय्यद, वॉर्डन सुभाष गावडे, धनंजय पवार, विशाल खताडे यांनी कारवाई केली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
57 views