logo

मतं मात्र हवीत, प्रतिनिधित्व नको!

मतं मात्र हवीत, प्रतिनिधित्व नको!

लातूर असो, महाराष्ट्र असो वा संपूर्ण देश—मुस्लिम समाजाचं मतदान हे राजकारणात हमखास गृहीत धरलेलं वास्तव बनलं आहे. मत मागायची गरजच नाही, कारण “ती आपोआप मिळतात” असा गैरसमजच नव्हे, तर गैरवापराचं धोरणच रूढ झालं आहे.
लातूर महानगरपालिकेच्या सत्ताकारणातही हेच चित्र पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आलं. महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव. ते मान्य. पण उपमहापौर पद ठरवताना मुस्लिम समाजाचा विचार झाला का? काँग्रेस पक्षाचा विजय झाला, लिंगायत समाजाला उपमहापौर पद मिळालं, पण मुस्लिम समाज मात्र पुन्हा ‘मतदार’ म्हणून वापरला गेला, भागीदार म्हणून नाही.
हा प्रश्न कोणत्या एका पक्षापुरता मर्यादित नाही. तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष असोत किंवा सत्ता हवी म्हणून सर्वांना सोबत घेणारे राजकीय गट—सगळ्यांसाठी मुस्लिम मतं म्हणजे राजकीय खात्री, पण प्रतिनिधित्व म्हणजे कायमचं दुर्लक्ष.
निवडणुकीपूर्वी भाषणांत संविधान, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षतेचे मोठमोठे शब्द; आणि सत्ता मिळाल्यावर मात्र सामाजिक न्यायाचा विसर—हा विरोधाभास आता उघडपणे दिसतो आहे.
मुस्लिम समाजाने विचार करायला हवा :
आपली भूमिका फक्त “मत देणारी जमात” एवढीच राहणार का?
आपण कधी सत्तेतील वाटेकरी होणार?
आणि जो पक्ष आपल्या मतांवर निवडून येतो, त्याला जाब कधी विचारणार?
लोकशाहीत मतदान हे भीक नसून हक्क आहे. आणि हक्काबरोबर जबाबदारीही असते—ती म्हणजे प्रश्न विचारण्याची, हिशेब मागण्याची आणि गरज पडल्यास राजकीय भूमिका बदलण्याची.
लातूरचा निकाल हे केवळ एक उदाहरण आहे. पण जर आजही मुस्लिम समाज गप्प राहिला, तर उद्या हाच इतिहास पुन्हा-पुन्हा घडत राहील.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

6
188 views