logo

मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांना हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनच्या वतिने विविध मागण्यांचे निवेदन सादर!

जळगांव
दिनांक ०६/०२/२०२६
(प्रतिनिधी आरिफ खान)
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या वतीने शेख अब्दुल रहीम सर यांनी नुकतीच शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. डॉ. पंकज राजेश भोयर यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या वतीने मंत्र्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे तर्फे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी परंपरेनुसार पुस्तक(डायरी) आणि शाल देऊन सत्कार केला. शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
🚩 निवेदनातील प्रमुख मागण्या:
✅ BLO कामातून मुक्ती: शिक्षकांना अशैक्षणिक कामातून (विशेषतः BLO) कायमस्वरूपी कार्यमुक्त करावे, जेणेकरून त्यांना पूर्ण वेळ अध्यापनाकडे देता येईल. शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे राज्यातील हजारो शिक्षक बांधवातर्फे आभारही व्यक्त करण्यात आलें.
✅ शिक्षण सेवक कालावधी रद्द करणे: नवीन शिक्षकांसाठी असलेला जाचक शिक्षण सेवक कालावधी रद्द करून त्यांना पहिल्या दिवसापासून पूर्ण वेतन श्रेणी लागू करावी.
✅ आश्वासित प्रगती योजना: इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही १०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनंतर सुधारित वेतन लाभाची 'आश्वासित प्रगती योजना' लागू करावी.
✅ TET अटीत शिथिलता: जे शिक्षक आधीपासूनच सेवेत रुजू आहेत, त्यांच्यासाठी TET परीक्षेची अनिवार्यता शिथिल करून त्यांना दिलासा द्यावा.
✅ कॅशलेस वैद्यकीय सुविधा: शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबाला गंभीर आजारांच्या उपचारासाठी इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 'कॅशलेस हेल्थ कार्ड'ची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
✅केंद्राप्रमाणे महागाई भत्ता व थकबाकी: केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे वाढीव महागाई भत्ता आणि त्याच्या थकबाकीची रक्कम शिक्षकांना विनाविलंब मिळावी.

यावेळी राज्यमंत्र्यांनी या मागण्यांवर प्रत्येक सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे तसेच शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदनाची एक प्रत देण्यात आली .

1
598 views