logo

मिनी मंत्रालयासाठी 24 लाख मतदार निवडणार कारभारी उद्या मतदान ः गटासाठी 271 गणासाठी 485 जण रिंगणात

सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि 136 गणासाठी उद्या शनिवारी( दि:७)मतदान होत असून 24लाख 45हजार 227 मतदार मिनी मंत्रालयाचा कारभार निवडणार आहेत 68 गटासाठी 271 तर 136 गणासाठी 485 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत
यंदा जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध अन्य पक्ष असा सामना रंगला . राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना शिंदे गट शिवसेना उबाठा. काँग्रेस या पक्षात काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाल्या या निवडणुकीसाठी 7 हजार 500बँलेट आणि तीन हजार 366 कंट्रोल युनिट लागणार आहेत त्याची तयारी पूर्ण झाली आहे एकूण 2 हजार 758 मतदार केंद्रापैकी 1हजार 379 मतदान केंद्रावर वेब कॉस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे मतदान यंत्राचे साहित्य वाटप ही त्या त्या तहसील पातळीवर शुक्रवारी दि.6 फेब्रुवारी रोजी होणार असून त्या त्या तहसील पातळीवरच जि.प च्या मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे

तालुकानिहाय मतदान
केंद्र व मतदार संख्या
तालुका केंद्रे(कंसात मतदार)

करमाळा 244(208023)
माढा 269(258714)
बार्शी 256(214754)
उत्तर सोलापूर 97(88992)
मोहोळ 220(198338)
पंढरपूर। 309(285826)
माळशिरस। 363(318281)
सांगोला। 274(262367)
मंगळवेढा। 189(169536)
दक्षिण सोलापूर 247(223367)
अक्कलकोट। 290(231029)
. एकुण।
...... 2758(2459227)

8
201 views