logo

मेळघाटातील MREGS कामांबाबत युवक काँग्रेस आक्रमक मजुरी न मिळाल्यास ‘अर्ध दफन आंदोलनाचा’ इशारा........? नेमकी घटना काय पहा समोर......?

मेळघाट | प्रतिनिधी : मेळघाट परिसरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS) अंतर्गत सुरू असलेली कामे सुरळीत न चालणे व मजुरांना वेळेत मजुरी न मिळाल्याने अमरावती जिल्हा युवक काँग्रेसने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास भविष्यात अर्ध दफन आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे. या संदर्भात बोलताना राहुलभाऊ येवले, जिल्हाध्यक्ष – युवक काँग्रेस (अमरावती) यांनी सांगितले की, मेळघाटातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये MREGS अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांची मजुरी अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे आदिवासी व गरीब मजूर आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. “शासनाच्या योजनेतून रोजगार देऊनही मजुरी वेळेवर मिळत नसेल, तर ही योजना केवळ कागदोपत्रीच उरली आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सर्व मजुरांची थकीत मजुरी त्यांच्या खात्यात जमा करावी,” अशी ठाम मागणी राहुल भाऊ येवले यांनी केली. यावेळी युवक काँग्रेसकडून प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, लवकरात लवकर दखल न घेतल्यास होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचीच राहील. मेळघाटातील मजुरांच्या हक्कासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

0
131 views