logo

बसस्थानकावरुन सोन्याची बांगडी लांबविली



जळगाव : मुक्ताईनगर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सिंधूबाई पाटील यांच्या हातातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कापून चोरली.

मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी त्या जळगावला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना ही घटना घडली. या घटनेबाबत अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

8
948 views