
स्व आशा बहुउद्देशीय संस्थेमार्फत बांधकाम कामगारांना कार्ड वाटप; योजनांची सविस्तर माहिती
स्व आशा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ओळखपत्र (कार्ड) वाटप करण्यात आले. यावेळी कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला संस्था चालक हितेंद्र जी झाडख़डे, ऑपरेटर सागर नेहरू बेलकर तसेच मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते. उपस्थित कामगारांना आरोग्य सुविधा, शिक्षण सहाय्य, विवाह अनुदान, अपघात विमा, आर्थिक मदत व इतर लाभदायक योजनांची माहिती देऊन त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर उपक्रम अभिजीत सबळीकर साहेब यांच्या मार्गदर्शनातून यशस्वीरीत्या पार पडला. या यशस्वी आयोजनाबद्दल स्व आशा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तसेच उपस्थित कामगारांच्या वतीने अभिजीत सबळीकर साहेब यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमामुळे बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्कांची जाणीव होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असून त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.