logo

सेंट. व्हयू इंटरनॅशनल स्कुल, कात्रज-कोंढवा रोड, पुणे शाळा अनधिकृत शासन्मान्यता नसताना शाळा अद्याप सुरु आहे.

सेंट. व्हयू इंटरनॅशनल स्कुल, शिवशंभो नगर, गल्ली क्र. ३, कात्रज कोंढवा रोड, पुणे ४११०४६ ह्या शाळेला शासनाने शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ अनधिकृत घोषित केली आहे व शाळेला शासन मान्यता नाही तरी पण शाळा व्यवस्थापनाने शासनाच्या आदेशाला कचऱ्याची टोपली दाखवत शाळा राजरोसपणे चालू ठेऊन विदयार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घातले आहे. ह्या शाळेला CBSE बोर्डाची मान्यता नसताना शाळा/मुख्यध्यापक/व्यवस्थापन शाळा CBSE बोर्डाशी संलग्न आहे असे खोटे सांगून पालकांची दिशाभूल फसवणूक करत बेकायदेशीर रित्या भरमसाठ फी वसूल करीत आहे. विशेष म्हणजे शाळा २०१०/२०१४ ची स्थापना सांगत असून शाळा जो UDISE नंबर वापरत आहे तो दौंड ग्रामीण च्या पत्त्यावर रजिस्टर आहे पण तिथे ह्या नावाची शाळाचं अस्तित्वात नाही. शाळा ग्रामीण भागातील UDISE नंबर चा गैरवापर करून पुण्यातील शहरी कात्रज-कोंढवा भागात राजरोसपणे कार्यान्वित आहे. शाळा/मुख्याध्यापक/व्यवस्थापन वेगवेगळ्या ऑनलाइन माध्यमांद्वारे शाळा CBSE बोर्डाशी संलग्न आहे अशा आशयाच्या जाहिराती करून शाळेची खोटी माहिती व फोटो टाकून पालकांची दिशाभूल फसवणूक करीत आहे व विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालत आहे. शाळेस शिक्षण विभागाने शाळा तत्काळ बंद करणे, प्रवेशित विद्यार्थ्यांचे पालकांमार्फत/विहित पद्धतीने नजीकच्या परिसरातील शासन मान्यताप्राप्त असलेल्या शाळेत समायोजन करणे व दंडात्मक कारवाईची नोटीस बजावलेली आहे.

0
0 views