logo

"अजित पवारांचा मृत्यू की घातपात? ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची फाईल कुठे?" राऊतांच्या सवालानं राजकारण तापलं ; न्यायालयीन चौकशीची मागणी

राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आज सभागृहात अजित पवार यांच्या निधनावरून अत्यंत गंभीर आणि धक्कादायक विधानं केली आहेत. "अजित पवारांसारख्या तडफदार नेत्याचा असा अकाली आणि रहस्यमय मृत्यू होणं ही लोकशाहीसाठी दुर्दैवी बाब आहे असं म्हणत राऊत यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आणि या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली.

सिंचन घोटाळ्याची 'ती' फाईल आणि मृत्यूचा घटनाक्रम :

संजय राऊत यांनी भाषणादरम्यान सिंचन घोटाळ्याचा संदर्भ देत काही खळबळजनक खुलासे केले.भाजप नेत्यांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतरही अजित पवार सत्तेत सामील झाले होते. मात्र, १५ जानेवारीला पवारांनी या घोटाळ्यात भाजपनेही पैसे खाल्ले आहेत आणि त्याची फाईल माझ्याकडे आहे असा दावा केला होता.

फाईल असल्याचं जाहीर केल्यानंतर अवघ्या १० दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. ही बाब अत्यंत संशयास्पद आहे.असा आरोप राऊतांनी केला.
ती फाईल अजित पवार नेहमी स्वतःसोबत ठेवत. मुंबईहून बारामतीला निघतानाही ती त्यांच्याकडे होती, पण मुंबई सोडल्यावर अवघ्या अर्ध्या तासात त्यांचा मृत्यू झाला. मग ती फाईल गेली कुठे?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

न्यायमूर्ती लोया प्रकरणाशी तुलना :

यावेळी संजय राऊत यांनी या प्रकरणाची तुलना थेट न्यायमूर्ती लोया प्रकरणाशी केली.अजित पवारांच्या मृत्यूमागे नक्कीच काहीतरी काळंं-बेरं असून हा घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही,असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले.

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ :

राऊत यांच्या या विधानामुळे केवळ संसदेतच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातही भूकंप झाला आहे. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची ती 'गुढ' फाईल नेमकी कोणाकडे आहे आणि राऊतांच्या या आरोपांनंतर सरकार काय पाऊल उचलणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

2
597 views