
ओव्हरब्रीज परिसरातील अपघात थांबवण्यासाठी लहुजी सेनेचे उपोषण;कडक इशारा ...
ओव्हरब्रीज परिसरातील अपघात थांबवण्यासाठी लहुजी सेनेचे उपोषण;कडक इशारा ...
श्रीरामपूर | (शिवप्रहार न्यूज/प्रतिनिधी)
श्रीरामपूर–नेवासा रोडवरील हरेगाव फाटा परिसरात असलेल्या ओव्हरब्रिजवर सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सोमवारी दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
यापूर्वी या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय लहुजी सेनेने प्रशासनाला निवेदन देऊन वेळ दिला होता. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. हरेगाव फाटा येथील ओव्हरब्रिज हा अपघातप्रवण ठिकाण ठरत असून येथे वारंवार गंभीर अपघात घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी तातडीने संरक्षक कठडे, सूचना फलक, रस्त्याची दुरुस्ती तसेच वाहतूक नियंत्रण व्यवस्था लागू करावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे.
या उपोषणामध्ये भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय सचिव हनीफभाऊ पठाण, राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेबजी बागुल, राजेंद्र त्रिभुवन, अल्ताफ शेख, रमिज पोपटिया, नंदकुमार बागडे, सिकंदर तांबोळी, रमजान शेख, हाजी गफार शेठ पोपटिया, सलीम मेमन, मच्छिंद्र साळुंखे, संदीप शेठ शेडगे, राज्यू भाऊ कडू, तात्यासाहेब सोनवणे, सतीश लोखंडे, मेहमूद पठाण, नागेश साथे, सलमान पठाण, अण्णा कुऱ्हाडे, रोहन परदेशी, सागर चापनेरकर तसेच रज्जाक शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
या उपोषणाला विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी भेट देऊन सह्या करत जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा कडक इशाराही यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक महिला व मागच्या आठवड्यात कार्तिक भंडारी नावाचा तरुण विद्यार्थी यांचा बळी या ओव्हर ब्रीजवरील वाहतूक गैरव्यवस्थेमुळे अपघात होवुन गेल्याने नागरिकांकडुन या आंदोलनाचे स्वागत करण्यात येत आहे.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015