logo

शिरसोली येथील ग्रामसभा पुन्हा घेण्याची मागणी



शिरसोली :

येथील ग्रामपंचायतीत ग्रामसभा सुरू असतांना मध्येच ग्रामविकास अधिकारी निघून गेल्याने ही ग्रामसभा झालेल्या सभेत पुन्हा घ्यावी व केलेले ठरावही ग्राह्य धरून नये अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

घरपट्टी, आकारणी कर अतिक्रमणासंदर्भातील व विषयांमध्ये ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले.

या सभेत पारीत करण्यात आलेले ठराव रद्दबातल करावे व ग्रामसभा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामसभा सुरू असताना मला न्यायालयीन कामकाज होते. या कामासाठी न्यायालयात जाण्यास उशीर होत होता. म्हणून मी सभेतून गेलो. व ग्रामसभेचे कामकाज सचिव म्हणून मराठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी काम पाहावे असे अधिकृत पत्र आदल्या दिवशी दिलेले असल्याने त्यांनीच पुढे कामकाज पाहिले.

जयपाल चिंचोरे, ग्रामविकास अधिकारी, शिरसोली

30
1081 views