
लोकशाहीच्या गळ्याला फास :
प्रा. दिपक पवार यांचा सत्तेला थेट इशारा
लोकशाहीच्या गळ्याला फास :
प्रा. दिपक पवार यांचा सत्तेला थेट इशारा
नांदेड | प्रतिनिधी
भारतीय लोकशाही आज केवळ धोक्यात नाही, तर नियोजित पद्धतीने गुदमरवली जात आहे, असा गंभीर आणि अस्वस्थ करणारा ईशारा मुंबई विद्यापीठाचे प्रखर विचारवंत प्रा. दिपक पवार यांनी दिला. “भारतीय लोकशाही समोरील आव्हाने” या विषयावर पिपल्स कॉलेज, नांदेड येथील नरहर कुरुंदकर सभागृहात, प्राचार्य ना. य. डोळे स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी सत्ताधाऱ्यांची निर्भीडपणे चिरफाड केली. हि व्याख्यानमाला राज्यशास्त्र विभागाने आयोजित केली होती. हे चौथे वर्ष आहे.
“लोकशाही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित केली जात आहे. नागरिकांना प्रेक्षक बनवले जात असून, प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे,” असे परखड मत मांडत प्रा. पवार यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला.
भाजपच्या खासदारांवर टीका करताना ते म्हणाले,“240 खासदार असूनही सरकार फक्त दोन जणांचे आहे. उरलेले 238 खासदार केवळ मानधन घेणारे, हात वर करणारे आणि निर्णयप्रक्रियेपासून पूर्णपणे वंचित आहेत. संसद ही चर्चा करण्याची जागा न राहता शिक्कामोर्तब करणारी संस्था बनवली जात आहे.”
त्यांच्या या विधानाने सभागृहात खळबळ उडाली. प्रत्येक वाक्य सत्तेच्या मुळावर घाव घालणारे होते. तडाखेबंद भाषा, ठोस संदर्भ आणि निर्भय भूमिका यामुळे सभागृहातील एकनाएक श्रोता अक्षरशः स्तब्ध झाला होता.
या व्याख्यानाची माहिती मला सकाळी दहा वाजता साहित्यिक व अभ्यासक प्रा. शिवाजी आंबुलगेकर यांच्या फोनमुळे मिळाली. ते मला फोनवर बोलतांना म्हणाले “दिपक पवार यांचे व्याख्यान ऐकणे म्हणजे आजच्या काळातील लोकशाहीची वस्तुस्थिती समजून घेणे. मी खास रजा टाकली आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थितीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांचा तो आग्रह माझ्यासाठी सार्थ ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार व नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे होते. मंचावर संस्थेच्या सचिव प्रा. शामल पत्की होत्या तर श्रोत्यांमध्ये दिपनाथ पत्की, पत्रकार आनंद कल्याणकर, प्रा. लक्ष्मण शिंदे, प्रा.यशपाल भिंगे, विशाल पंतगे,शिवाजी आंबुलगेकर, बालाजी कोपलवार उपस्थित होते.
आज जेव्हा बहुतेक शैक्षणिक संस्था सत्ताधाऱ्यांच्या भीतीने गप्प बसल्या आहेत, त्या काळात पिपल्स कॉलेज, नांदेड हे लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैचारिक निर्भयतेचे केंद्र म्हणून उभे आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
उद्या जेव्हा या काळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा सत्तेपुढे न झुकणाऱ्या संस्था कोणत्या होत्या, याची नोंद घेतली जाईल. आणि त्या यादीत पिपल्स कॉलेजचे नाव अग्रभागी असेल. असा विश्वास अनेकानी बोलून दाखवला.
Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015