logo

परिचारिकांनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावे- खासदार डॉ. प्रशांत पडोळे सुनंदा नर्सिंग कॉलेजचा स्नेहसंमेलन उत्साहात साजरा


परिचारिकांनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावे- खासदार डॉ. प्रशांत पडोळे
सुनंदा नर्सिंग कॉलेजचा स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- फ्लॉरेन्स नाइटिंगेल (Florence Nightingale) या आधुनिक परिचर्येच्या (नर्सिंगच्या) संस्थापक आणि समाज सुधारिका होत्या, ज्यांना त्यांच्या कार्यामुळे 'लेडी विथ द लॅम्प' (Lady with the Lamp) म्हणून ओळखले जाते. त्यांनी आरोग्यसेवा, स्वच्छता आणि संख्याशास्त्राचा (Statistics) वापर करून रुग्णसेवेत क्रांती घडवली आहे. क्रिमियन युद्धादरम्यान त्यांनी सैनिकांची सेवा केली आहे. जिथे रोगराईने मरणाऱ्या सैनिकांची संख्या जखमांमुळे मरणाऱ्यांपेक्षा जास्त होती. त्यांनी स्वच्छता आणि आहारावर भर देऊन यात मोठे बदल घडवले. त्यांच्या कार्यामुळे नर्सिंगला सन्मान मिळाला आणि 'जागतिक नर्स दिन (International Nurse Day) म्हणून त्यांचा जन्मदिवस, १२ मे ला साजरा करण्यात येत असतो. म्हणून परिचारिकांनी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केले.
ते अखिल सभागृह गणेशपुर येथे सुनंदा स्कूल ऑफ नर्सिंग भंडारा च्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व शपथ विधी कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नदिम खान होते. प्रमुख अतिथी म्हणून नंदगोपाल फाऊंडेशनचे अध्यक्ष गोपाल लांजेवार, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, नंदगोपाल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार, रविशंकर साकोरे, प्राचार्य सतिश कुमार नाग्गीरेड्डी, संचालिका डॉ. आशा लांजेवार, स्नेहा नाग्गीरेड्डी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सरस्वती माता व आधुनिक परिचारिका संस्थापक फ्लाॅरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, दिप प्रज्वलित करून तसेच नविन प्रवेश घेणाऱ्या परिचारिकांनी शपथ घेतल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्मृतिचिन्ह, गुलाब रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
सुनंदा स्कूल ऑफ नर्सिंग येथील वार्षिक निकालात जीएनएम तृतीय वर्षाच्या कु. हिना गेडाम व मोनाली गडपायले, द्वितीय वर्षात कु. श्रृती देवगडे हिने प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल रोख रक्कम, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सुनंदा स्कूल ऑफ नर्सिंगच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना ट्राफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पालकांना गर्व असायला पाहिजे की, आपल्या मुली-मुले हे परिचारिका (नर्सेस) अभ्यासक्रमाला शिक्षण घेत आहेत. पूर्वी मुलांची काळजी आई घ्यायची. मात्र प्रोफेशनल अभ्यासक्रमानुसार रुग्णांची (लोकांची) काळजी घेणाऱ्या म्हणजे परिचारिका (नर्सेस) आहेत. म्हणून उत्कृष्ट परिचारिका घडविण्याचे कार्य सुनंदा स्कूल ऑफ नर्सिंग सातत्याने करत आहे. असे मत वरिष्ठ पत्रकार प्रा. नदिम खान यांनी व्यक्त केले.
त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्री फुले व आधुनिक परिचारिका फ्लाॅरेन्स नाईटिंगेल यांच्या जिवन चारित्र्यावर विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात कोळी नृत्य, आदिवासी समाजाच्या विविध धार्मिक संस्कृती, ऑपरेशन सिन्दुर, भारतातील विविध संस्कृतीचे दर्शन, महाभारत, आधुनिक परिचारिका फ्लाॅरेन्स नाईटिंगेल यांच्या जिवनावर आधारित इत्यादी विषयांवर सुनंदा स्कूल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी विविध जनजागृतीवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाला सुनंदा स्कूल ऑफ नर्सिंगचे पदाधिकारी, शिक्षक- शिक्षिका, विद्यार्थी- विद्यार्थिनींनी, कर्मचारी, पालकवर्ग तसेच नंदगोपाल फाऊंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी मेश्राम, हेमलता पंचभाई व ईशिका बागडे, मिनल इरले यांनी केले. व प्रास्ताविक प्राचार्य सतिश कुमार नाग्गीरेड्डी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य ललित भुरे व रश्मी थोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्की मेश्राम, प्रियंका तुरस्कर, लभिका डाकरे, ऐश्वर्या वखरे, रिता गोंडाने, प्रिती गभणे, प्रगती देशमुख, समिक्षा मेश्राम, सानिया उईके, मनिषा सुखदेवे, थमु राऊत, उत्कर्ष मेश्राम, अश्विनी मेश्राम, सायली भुरे, आस्था चामट, प्रिन्सी बागडे, पुर्वा उरकुडे, प्राची मडावी, मोनाली गडपायले, करिना भांबोरे, तृप्ती कोल्हाटकर, श्रृती देवगडे, कोयल लांजेवार, हिना गेडाम, साक्षी मेश्राम, अलिषा चव्हाण, सलोनी मेश्राम, निकिता वाहणे, हर्षदा कुंभारे तसेच सुनंदा स्कूल ऑफ नर्सिंग भंडारा येथील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनींनी व नंदगोपाल फाऊंडेशनचे विलास केजरकर, राज गौतम, राहुल मेश्राम, सुंदरलाल मेघवानी, अनोद साठवणे, नंदगोपाल फाउंडेशन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

3
216 views