logo

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा व तब्बल २१ गुन्हे असलेला आरोपी पकडला; श्रीरामपुरातही एक गुन्हा दाखल...


१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा व तब्बल २१ गुन्हे असलेला आरोपी पकडला; श्रीरामपुरातही एक गुन्हा दाखल...


संगमनेर/श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की, कुरण ता. संगमनेर तालुक्यातील तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी वय -13 वर्षे, हिस आरोपी नामे कलीम अकबर पठाण, रा. जमजम कॉलनी ,संगमनेर याने कशाचे तरी अमिष दाखवुन पळवुन नेले आहे. सदर घटनेबाबत संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 866/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 37(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेवुन अपहरण करणारे आरोपीस ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले.सदर आदेशानुसार पोनि श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, महिला पोलीस अंमलदार, ज्योती शिंदे, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेवुन अपहरण झालेल्या मुलींची माहिती काढणेकामी पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
वरील पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी व पिडीत मुलीचे व्यवसायीक कौशल्याचे आधारे शोध घेत असतांना पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी हा अपहरण केलेल्या मुलीसह झरेकाटी येथुन देवगाव मार्गे संगमनेर येथे विना नंबरचे बजाज प्लॅटीना मोटारसायकलवर येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने देवगाव रोड सिध्दकला हॉस्पिटलजवळ सापळा लावुन थांबले असता गुन्ह्यातील आरोपी हा गुन्ह्यातील पिडीत मुलीसह मोटार सायकलवर येतांना दिसुन आला. तेव्हा पथकाने शिताफिने ताब्यात घेवुन त्याला त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) कलीम अकबर पठाण वय- 22 वर्षे रा. गल्ली नं.10 जमजम कॉलनी, संगमनेर, ता.संगमनेर जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.तसेच महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने पिडीत मुलगी हिस ताब्यात घेण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीकडुन 30,000/-रु कि.ची एक बजाज प्लॅटिना मोटार सायकल जप्त करण्यात आला आहे.आरोपी कलीम अकबर पठाण यास त्याच्या ताब्यात मिळुन आलेल्या मोटार सायकलबाबत विचारपुस करता त्याने सदर मोटारसायकल त्याचा साथीदार जुनेद युनुस शेख,रा. समनापुर याचे सोबत झोळे ता.संगमनेर येथुन चोरी केल्याचे सांगितले आहे. सदर घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे अभिलेखाची खात्री करता संगमनेर तालुका पो.स्टे एन.सी.आर.नं. 81/2026 भारतीय न्यांय सहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी नामे कलीम अकबर पठाण यांचेविरुध्द अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर 109/2019 भादवि कलम 394,34
2 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 112/2021 म.जु.का.क 379
3 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 165/2021 भादवि कलम 392,34
4 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 170/2021 भादवि कलम 399,402
5 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 181/2019 भादवि कलम 380, 457
6 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 183/2018 भादवि कलम 380,457,454
7 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 196/2019 भादवि कलम 380,457
8 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 214/2018 भादवि कलम 380,457
9 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 333/2021 भादवि कलम 392
10 संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर 337/2022 भादवि कलम 394,392,34
11 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 349/2021 भादवि कलम 379
12 संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर 361/2022 भादवि कलम 392,34
13 शिर्डी, जि. अहिल्यानगर 425/2022 भादवि कलम 392, 34
14 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 429/2018 भादवि कलम 380,457
15 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 432/2019 भादवि कलम 353,332
16 संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर 502/2022 भादवि कलम 392, 34
17 श्रीरामपुर शहर, जि. अहिल्यानगर 595/2022 भादवि कलम 379,
18 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 688/2022 भादवि कलम 394, 34
19 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 742/2022 भादवि कलम 392, 34
20 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 860/2024 बी.एन.एस.कलम 310(4),(5)
21 संगमनेर शहर, जि. अहिल्यानगर 916/2023 भादवि कलम 307,224
ताब्यातील आरोपी, मुद्देमाल व अल्पवयीन मुलगी यांना संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 866/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे गुन्ह्याचे पुढील तपासकामी संगमनेर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी हजर केले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
224 views