logo

Aima midiya jan jan ki avaj दिनांक 2.2.2026 am12:08 Pimpri Chinchwad Mayor Election: पिंपरी-चिंचवड महापालिकेत ६ फेब्रुवारीला महापौर निवडपिंपरी: पिंपर

Aima midiya jan jan ki avaj
दिनांक 2.2.2026 am12:08
Pimpri Chinchwad Mayor Election: पिंपरी-चिंचवड महापालिकेत ६ फेब्रुवारीला महापौर निवडपिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नव्या महापौरपदाची निवड शुक्रवारी (दि. 6) होणार आहे. त्या दिवशी महापालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा आहे. त्या दिवसापासून प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर महापालिकेतील प्रशासकीय राजवटीचा अंत होणार असल्याने नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.तीन आयुक्तांनी प्रशासकीय राजवटीत काम पाहिले

कोरोना महामारी, ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयात वाद आदी कारणांमुळे महापालिकेची निवडणूक फेबुवारी 2022 ला झाली नाही. त्यामुळे महापालिका 12 मार्च 2022 ला बरखास्त झाली. दुसऱ्या दिवसापासून 13 मार्चपासून महापालिकेत आयुक्त हे प्रशासक म्हणून कामकाज पाहू लागले. त्यानंतर तब्बल 4 वर्षे प्रशासक महापालिकेचा संपूर्ण कारभार पाहत आहेत. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील, शेखर सिंह व श्रावण हर्डीकर या तीन आयुक्तांनी प्रशासकीय राजवटीत काम पाहिले.

प्रशासकीय राजवटीत अनेक मोठ्या व खर्चिक विकासकामांना मान्यता देण्यात आली. त्यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच, मुळा नदी सुधार योजनेसाठी 200 कोटींचे म्युन्सिपल बॉण्डद्वारे आणि हरित सेतूसाठी 200 कोटींच्या ग््राीन बॉण्डद्वारे कर्ज काढण्यात आले. अनेक खडलेल्या तसेच, प्रलंबित कामांना मंजुरी देण्यात आली. तब्बल चार वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक 15 जानेवारीला झाली. दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल लागला. त्यात भाजपचे 84, राष्ट्रवादी काँग््रेासचे (अजित पवार) 37, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 6 आणि अपक्ष 1 असे नगरसेवक निवडून आले.6 फेबुवारीला होणार महापौर पदाची निवड

सत्ताधारी भाजपचा नगरसेवक येत्या शुक्रवारी (दि. 6) महापौर होणार आहे. त्यासाठी सकाळी अकराला विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. त्यात महापौराची निवड केली जाणार आहे. महापौर पदाच्या निवडीनंतर महापालिकेची प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. त्या दिवसापासून महापौर तसेच, नगरसेवकांमार्फत महापालिकेचे दैनंदिन कामकाज सुरू होईल. त्या माध्यमातून प्रभागातील नागरी समस्या व अडचणींची सोडवून केली जाईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 6) सकाळी अकराला आयोजित केली आहे. त्यासाठी सोमवारी (दि. 2) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी महापौर कोण होणार, हे स्पष्ट होणार आहे. महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहातील या पंचवार्षिकेतील पहिली सभा शुक्रवारी होणार आहे. त्यात सत्ताधारी भाजपचा एक नगरसेवक महापौरपदी विराजमान होणार आहे. महापौर पदाच्या निवडीसाठी सोमवारी दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पिंपरी, चिंचवड की भोसरी विधानसभेच्या गटातील कोणत्या नगरसेवकांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.महापौर, स्थायी समिती अध्यक्षांचे नाव गुलदस्तात

भाजपचा कोणता नगरसेवक महापौर होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्या पदासाठी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले शीतल शिंदे, माजी गटनेते राहुल कलाटे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, सलग दोन वेळा बिनविरोध निवडून नगरसेवक रवी लांडगे आणि इतर नावांची चर्चा आहे. तसेच, स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे. त्या पदासाठी अनेक नगरसेवक इच्छुक आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. महापौर पदाचे नाव निश्चित झाल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असेल, हे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाने महापालिकेतील पक्षाच्या गटनेतेपदाचे नाव जाहीर केले आहे. याबबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सांगवीतील प्रशांत शितोळे यांच्या नावावर एकमत झाले. याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. महापालिका निवडणुकीत बहुमत प्राप्त झाल्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुकीत पक्षाचे 84 आणि पुरस्कृत अपक्ष 1 असे 85 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानुसार, विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करण्यात आली. त्यानुसार नावे मुंबईतील कार्यालयात पाठविल्यानंतर अखेर शनिवारी गटनेत्याचे नाव जाहीर करण्यात आले. दरम्यान, सत्तारूढ पक्षनेता निवड करण्याबाबत अद्याप कोणेतही नाव निश्चित झाले नसून, ती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली. सोमवारपासून प्रत्यक्षात नगरसचिव कार्यालयात महापौर निवडीचा कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी गटनेतापदी निवड गरजेची होती.
दरम्यान, स्थायी समितीच्या सदस्यांमध्येदेखील भाजपचे सर्वांधिक 11 जागा असणार आहेत. राष्ट्रवादीच्या वाटेला 37 नगरसेवक असल्याने ते विरोधी बाकावर असले तरी त्यांच्यातील 4 जण हे स्थायी समितीतील असतील, तर शिवसेनेचा 1 नगरसेवक असेल. यापैकी शिवसेनेने नोंदणी करीत गटनेता म्हणून नाव जाहीर केले आहे. त्यापाठोपाठ आता भाजपनेदेखील निवड केली. तर, राष्ट्रवादी काँग््रेासची नोंदणी होणे बाकी आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेत्याचे नाव समोर येऊ शकेल.

राष्ट्रवादीतील मुरब्बी गटनेतेपदी

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी महापालिकेवर आपला दबादबा कायम राखण्यासाठी आक्रमक चेहरा म्हणून विरोधी पक्षनेत्याचा शोध घेत आहेत. तर, भाजपकडून रणनीती म्हणून सांगवीतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आणि विविध पदांवर काम केलेले प्रशांत शितोळे यांची नाव जाहीर केले आहे.




0
211 views